BREAKING NEWS : विधानसभेआधी वंचित बहुजन आघाडीत फूट, MIM पडलं बाहेर

वंचित बहुजन आघाडीतून MIM बाहेर पडलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे MIM ने हा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 05:33 PM IST

BREAKING NEWS : विधानसभेआधी वंचित बहुजन आघाडीत फूट, MIM पडलं बाहेर

मुंबई, 6 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीतून MIM बाहेर पडलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे MIM  ने हा निर्णय घेतला आहे.

जागावाटपाबद्दल MIM चा सन्मान ठेवला गेला नाही, असं इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर प्रकाश आंबेडकरांकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणं ठरणार होती. पण आता MIM बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणं बदलू शकतात. MIM ने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

VIDEO: जागावाटपावरून सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

MIM ला 98 जागांवर निवडणूक लढवायची होती पण ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे असासदुद्दीन ओवेसी यांच्या या पक्षाने वंचित बहुजन आघाडीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Loading...

लोकसभा निवडणुकीत MIM ने वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत औरंगाबादमध्ये MIM चे इम्तियाज जलील हे खासदार झाले पण MIM सोबत गेल्यामुळे मुस्लीम मतं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नाहीत.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या पण जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीत फूट पडली आहे.

======================================================================================================

VIDEO : किल्ले पार्ट्यांसाठी देणार का? आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...