मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

यवतमाळमध्ये भीषण अपघात; पुलावरील तिघांना धडक देत 33 मजूरांसह नदीत कोसळली व्हॅन

यवतमाळमध्ये भीषण अपघात; पुलावरील तिघांना धडक देत 33 मजूरांसह नदीत कोसळली व्हॅन

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथे तीन लोक नदीच्या पुलावर उभे असताना व्हॅनने या तिघांना धडक दिली. यानंतर व्हॅन नदीत कोसळली. (Road Accident)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ 28 सप्टेंबर : मजूर घेऊन जाणाऱ्या एका पीकअप व्हॅनचा बाभूळगाव तालुक्यातील नायगावजवळ अपघात झाला. सकाळी 8 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. बुलढाणा येथील पीक व्हॅन मजूरांना घेऊन चंद्रपूरकडे जात होती. याच दरम्यान नायगावजवळ हा अपघात झाला.

नजर हटी..., नियंत्रण सुटले अन् सुसाट कार 4 वेळा पलटली, अपघाताचा LIVE VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथे तीन लोक नदीच्या पुलावर उभे असताना व्हॅनने या तिघांना धडक दिली. यानंतर व्हॅन नदीत कोसळली. या व्हॅनमधून 33 मजूर प्रवास करत होते. त्यापैकी 21 जण जखमी झाले असल्याचं समोर येत आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयत दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत एकाचा मृत्यूही झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बुलडाण्यातही भीषण अपघात -

बुलडाणा जिल्ह्यातही एक भीषण अपघात झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारला अपघात झाला. कारने महामार्गावरच 3 ते 4 वेळा पलट्या घेतल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

मरणानंतरही सुटका नाही, अंत्यसंस्कार करावा लागत आहे रस्त्याच्या कडेला!

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर हा अपघात घडला. शेगाववरून एक 4 चाकी भरधाव कार खामगावच्या दिशेने जात होती. अचानक महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरच पलटी झाली. कारने 3 ते 4 पलट्या घेतल्या आणि त्यानंतरच थांबली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही

First published:

Tags: Accident, Road accident