मुंबई, 25 जानेवारी : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचं निधन झालं. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेचरा श्वास घेतला. त्याच्या पश्चात मुलगा प्रल्हाद वामनराव पै, मुलगी मालन कामत, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया निखिल पै आणि पणतू असा परिवार आहे.
शारदामाईंच्या निधनामुळे जीवन विद्या मिशन परिवारावर शोककळा पसरली आहे. वामनराव पै यांच्या निधनानंतर जीवन विद्या मिशनच्या प्रत्येक कार्यात शारदामाई सक्रीय सहभागी असायच्या. तसंच जीवन विद्या मिशनच्या नामधारकाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आता शारदामाईंच्या निधनाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : वडील होते पुजारी, कथित चमत्कारांमुळे चर्चेत आलेले धीरेंद्र शास्त्री आहेत तरी कोण?
वामनराव पै यांनी जीवन विद्या मिशनची स्थापना १९५५ मध्ये केली होती. तर नोंदणी १९८० मध्ये करण्यात आली होती. जीवन विद्या मिशनच्या कामाचे नियोजन करण्यासाठी विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. २००६ मध्ये जीवन विद्या मिशनला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी सोहळासुद्धा आय़ोजित केला होता. वामनराव पै यांचे दहा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai