मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चोर असल्याच्या संशयावरुन सहा जणांना बेदम मारहाण, दोघांचा मृत्यू

चोर असल्याच्या संशयावरुन सहा जणांना बेदम मारहाण, दोघांचा मृत्यू

    औरंगाबाद, 08 जून : वैजापूर तालुक्यात चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी सहा जणांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत 2 जणांचा संशयित चोरांचा मृत्यू झालाय. वैजापूर तालुक्यातील पानव चांडगावात ही घटना घडलीय.

    गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी तालुक्यात त धुमाकूळ घातला होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी जागता पहारा देत आहेत. शेवटी चांडगावात हे सहा जण संशयित रित्या फिरत असतांना नागरिकांनी त्यांना पकडून चांगलीच मारहाण केली होती. जखमी संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेवून उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.

    First published:
    top videos