बीड, 19 ऑक्टोबर : भ्रष्टाचाराच्या प्रकारणात मागील 2 वर्षांपासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाखांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला.
वैद्यनाथ बँकेने कळंब येथील बँकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयाचे कर्ज प्रकरण मंजूर केले असल्याचे समजते. आणि त्या प्रकरणी चेअरमन अशोक जैन याने 15 लाख रुपयांची लाच मागितली होती.
..अजून तिने नीट डोळेही उघडले नव्हते, 41 तासांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा
त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर आज 15 लाखांच्या रक्कमेपैकी 10 लाख रूपये आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास चेअरमन अशोक जैन यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले होते.
ठरलेल्या वेळेनुसार, तक्रारदार 10 लाखांची रक्कम घेऊन अशोक जैन यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी औरंगाबाद येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी 10 लाखांची लाच घेत असताना अशोक जैन यांना रंगेहात पकडण्यात आले.
..आणि देवेंद्र फडणवीस थेट चिखलातून निघाले चालत, पाहा हा VIDEO
या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यनाथ सहकारी बँकही भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.