एसटी क्लार्कचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला, 1 मार्काने हुकलेली पोस्ट प्रथम येऊन मिळवली!

एसटी क्लार्कचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला, 1 मार्काने हुकलेली पोस्ट प्रथम येऊन मिळवली!

करमाळा इथं राहणाऱ्या वैभव नवले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  • Share this:

सोलापूर, 15 मार्च : अपयशाने खचून न जाता प्रयत्न केल्यावर यश कसं पायाशी लोटांगण घालतं, याचं उदाहरण सोलापुरातून समोर आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथं राहणाऱ्या वैभव नवले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

करमाळ्यात राहणाऱ्या वैभव नवले याची आधी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अवघ्या एका मार्काने पोस्ट हुकली होती. मात्र आज (मंगळवारी) जाहीर झालेला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेचा निकाल वैभवसाठी खुशखबर घेऊन आला. या परीक्षेत वैभवने घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.

यशानं हुलकावणी दिली, पण वैभव अपयशाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिला...

वैभव नवले हा मुळचा करमाळा शहरातील असून त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे करमाळ्यातच पूर्ण झाले आहे. त्यानंतर वैभवला स्पर्धा परीक्षांचे वेध लागले. 2016 साली झालेल्या पीएसआय परीक्षेत वैभवला अवघ्या एका मार्कामुळे अपयशाचं तोंड पाहायला लागलं. मात्र अपयश आलं म्हणून तो खचला नाही. त्याने अजून मेहनत घेतली आणि जिद्द्याच्या जोरावर यश खेचून आणलं.

दरम्यान, वैभव नवले याचे वडील एसटी विभागात क्लार्क पदावर कार्यरत होते. नुकतेच ते आपल्या सेवेतून निर्वृत झाले. त्यानंतर आता वैभवने मिळवलेल्या यशाने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. गुलाल उधळून वैभवच्या कुटुंबाने आपला आनंद साजरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: solapur
First Published: Mar 17, 2020 08:17 PM IST

ताज्या बातम्या