प्रशांत बाग (प्रतिनिधी)
नाशिक, 11 मे- प्रसिद्ध नाट्य, चित्रपट अभिनेते वैभव मांगले यांच्या टीमला नाशकात चोरट्यांनी चांगलाच हात दाखवला आहे. कालिदास रंगमंदिरातून मांगले यांच्या टीमची एक बॅग चोरीला गेली आहे. या चोरीमुळे नाशिक पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 'अलबत्या गलबत्या'च्या प्रयोगासाठी टीम नाशकात आली होती. कालिदास रंगमंदिर आवारात कलाकारांची बस उभी होती. बसमधून बॅग चोरट्यांनी लांबवली. भरदिवसा ही घटना घडली.
कार्यालयाला फक्त कडी..पोलिसांना पालिका कर्मचाऱ्यांना फटकारले..
तपासासाठी आलेल्या पोलिसांनाही पालिका कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. CCTV फुटेज देण्यासाठी येथे कर्मचारीच नाही. तसेच शनिवार, रविवार सुट्टीमुळे कालिदास रंगमंदिराच्या कार्यालयाला फक्त कडी लावल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल