उत्कर्ष शिंदे यांच्या मागणीला यश, वृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात जमा

उत्कर्ष शिंदे यांच्या मागणीला यश, वृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात जमा

उत्कर्ष शिंदे यांनी या कलावंताच्या व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडल्या.

  • Share this:

सुमित सोनवणे, पुणे, 19 सप्टेंबर : लॉकडाऊनच्या काळात सर्व कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांना जगणे मुश्किल झाले होते. यासोबतच वृद्ध कलावंतांना शासनाच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे शासनाकडून देण्याचे बंद करण्यात आली होती त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी आपल्या व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर उत्कर्ष शिंदे यांनी या कलावंताच्या व्यथा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडल्या.

मानधनाच्या अभावी वृद्ध कलावंत यांना उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. हे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उत्कर्ष शिंदे यांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने नोंदणी असलेल्या वृद्ध कलावंतांच्या दरमहा मानधनाची थकीत रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे वृध्द कलावंतांना दिलासा मिळाले आहे. तसेच गायक संगीतकार उत्कर्ष शिंदे यांनी या वृद्ध कलावंतांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अथवा इतर आरोग्य योजनेत सहभागी करण्याच्या मागणीवर विचारा करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसंच याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 20, 2020, 12:14 AM IST

ताज्या बातम्या