मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्या' वक्तव्यामुळे राज्यपालांसाठी अपमानास्पद शब्दांचा वापर; गुन्हे शाखेकडून एकाला अटक 

'त्या' वक्तव्यामुळे राज्यपालांसाठी अपमानास्पद शब्दांचा वापर; गुन्हे शाखेकडून एकाला अटक 


आज घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोक उत्साहाने प्रतिसाद देत आहे. हे खूप आशादायी चित्र आहे

आज घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोक उत्साहाने प्रतिसाद देत आहे. हे खूप आशादायी चित्र आहे

राज्यपालांना टीका करणं एकाला भोवलं...

    मुंबई, 8 ऑगस्ट : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून टीका केली जात होती. सोशल मीडियावरुनही अनेकांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान या प्रकरणात एक व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रान्च CIU प्रदीप भालेराव याला अटक केली आहे. राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याविरोधात ट्विटरवर अपमानास्पद टीका केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. भालेकरला कुरार, मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. अनेकदा टीका करताना ट्रोलर्सकडून मर्यादा पाळल्या जात नाहीत आणि अत्यंत हीन आणि खालच्या शब्दांत प्रतिक्रिया दिल्या जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर सेल कारवाई करत असतो. या प्रकरणात पुढील तपास मुंबई सायबर सेलला हँडओव्हर करण्यात आला आहे. काय म्हणाले राज्यपाल? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagar Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. राजस्थानी आणि गुजराती लोक निघून गेल्यास मुंबईत (Mumbai City) पैसाच उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. माफीनामा.. त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे निवेदन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध केले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Governor bhagat singh, Mumbai, Mumbai police

    पुढील बातम्या