कचरा डम्पिंगवरून उरुळी देवाची-फुरसुंगी ग्रामस्थ आक्रमक

कचरा डम्पिंगवरून उरुळी देवाची-फुरसुंगी ग्रामस्थ आक्रमक

उरुळी देवाची-फुरसुंगीमधील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • Share this:

पुणे, 24 फेब्रुवारी : उरुळी देवाची-फुरसुंगीमधील ग्रामस्थ कचरा डम्पिंगच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुणे महापालिका ngt चा आदेश असूनही अद्यापपर्यंत कचरा ओपन डम्पिंग करत आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

यापुढे एकही कचरा गाडी येऊ देणार नाही, असं म्हणत उरुळी देवाची-फुरसुंगीमधील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आज एकही कचऱ्याची गाडी फिरकली नाही. पालिका अधिकाऱ्यांनी मात्र ओपन डम्पिंग करत नाही, पण जो रिजेक्टचा माल आहे तो 10 टक्के असतो. तो कचरा प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पात टाकला जातोय, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

सोलापूरची स्नेहल अंबरकर बनली पहिली लोकोपायलट, 'राजधानी' चालवण्याचंही स्वप्न

मात्र 'गेली 22 वर्षे फसवणूक सुरू आहे. कचराकोंडी मात्र कायम आहे. आमच्या जमिनी परत करा. मुलांना नोकऱ्या द्या,' अशा मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. पालिकेचे अधिकारी हे मुंबईला गेले आहेत. ते परत आल्यावर उद्या मंगळवारी चर्चा करतील, अशी माहिती ही माजी सरपंच संजय हरफळे यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर आता ग्रामस्थ आणि पालिका अधिकारी यांच्या चर्चेतून कचरा कोंडी फुटेल का याकडे लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Feb 24, 2020 08:56 PM IST

ताज्या बातम्या