महाराष्ट्राचा महासंग्राम : उरणमध्ये शिवसेनेसमोर जागा टिकवण्याचं आव्हान

महाराष्ट्राचा महासंग्राम : उरणमध्ये शिवसेनेसमोर जागा टिकवण्याचं आव्हान

उरण मतदारसंघात याहीवेळी चुरशीची लढत होण्याची चिन्हं आहेत.

  • Share this:

उरण, 21 सप्टेंबर : उरण मतदारसंघावर आधी शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं पण 2014 च्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेला मिळाली. इथे झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे महेश बाल्डी यांना 32 हजार 600, काँग्रेसचे महेंद्र घरत यांना 34 हजार 253, शेकापचे विवेकानंद पाटील यांना 55 हजार 320 मतं मिळाली. शिवसेनेचे मनोहर भोईर 56 हजार 131 मतं मिळवून विजयी झाले. या चुरशीच्या सामन्यात शिवसेना फक्त 811 मतांनी विजयी झाली.

उरण हा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इथे थेट लढत होती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्यात. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे इथून विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उरण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला 86 हजार मतं मिळाली होती तर शिवसेनेला 89 हजार मतं मिळाली होती. सेनेला केवळ 3000 मतांचीच आघाडी होती. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीतही चुरस होणार यात शंका नाही.

उरण विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या ही दोन लाख नव्वद हजारच्या घरात आहे. ज्यात प्रामुख्याने 40 टक्के हा युवा मतदार आहे. तर जिंकण्यासाठी इथे आगरी, कोळी मतदारांवर भिस्त जास्त असते. यावेळी युती झाली तर शिवसेनेसाठी थोडासा दिलासा असण्याची शक्यता आहे.

उदयनराजेंना भाजपच्याच इच्छुकांनी दिला धक्का? साताऱ्यात रंगलं पक्षांतर्गत राजकारण

इथे युती झाली तर भाजपकडून इच्छुक असेलेले महेश बाल्डी हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे इथे शिवसेनेसमोर युती झाली तरी मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. शिवाय इथं आघाडीचं एक मोठ्ठं आव्हान सेनेसमोर असणार आहे.

उरणवर वर्चस्व राहिलेला शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची इथे आघाडी होऊ घातली आहे. त्यामुळे शेकाप इथे जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकतं. भाजप आणि सेनेचं रायगड आणि परिसरातलं वाढतं प्राबल्य यामुळे शेकापसाठी उरण लढाई ही अस्तित्वाची असणार आहे.

या निवडणुकीत इथे आता दुहेरी लढत होते की गेल्यावेळी प्रमाणे बहुरंगी लढत होते ते पाहावं लागेल.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

महेश बाल्डी, भाजप - 32 हजार 600

महेंद्र घरत, काँग्रेस - 34 हजार 253

विवेकानंद पाटील, शेकाप - 55 हजार 320

मनोहर भोईर, शिवसेना - 56 हजार 131

==========================================================================================

महाराष्ट्राचा महासंग्राम : उरणमध्ये शिवसेनेसमोर जागा टिकवण्याचं आव्हान

Published by: Arti Kulkarni
First published: September 21, 2019, 5:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading