• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • UPSC Result : मागील वर्षी कोरोनाने वडिलांना हिरावलं, लेकानं UPSC परीक्षा पास करून दाखवली!

UPSC Result : मागील वर्षी कोरोनाने वडिलांना हिरावलं, लेकानं UPSC परीक्षा पास करून दाखवली!

 प्रथमेश याचे वडील सैनात नोकरीला होते. मागील वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

प्रथमेश याचे वडील सैनात नोकरीला होते. मागील वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

प्रथमेश याचे वडील सैनात नोकरीला होते. मागील वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

  • Share this:
चिपळूण, 24 सप्टेंबर : केंद्रीय लोक सेवा आयोगाने (UPSC) 2020 झालेल्या सिव्हील सेवाच्या मुख्य परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. कोरोनाच्या या काळात शर्थीने खिंड लढवत अनेक जणांनी घवघवीत यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील चिपळूण तालुक्यातील एका छोट्याशा गावातून प्रथमेश अरविंद राजेशिर्के उत्तीर्ण झाला आहे. पण, त्यांचं यश पाहण्यासाठी त्याचे बाबा आज सोबत नाही. मागील वर्षी त्यांचं कोरोनानं निधन झालं होतं. (Civil Services Main 2020 Result ) चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र प्रथमेश अरविंद राजेशिर्के (prathamesh rajeshirke) यांनी दिल्ली येथे झालेल्या 2020 च्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत पुरुषांमध्ये पहिला IPS अधिकारी होण्याचा मान पटकावला आहे (all india rank 236) नवरीबाई जोमात नवरदेव कोमात! स्वतःच्याच लग्नात घातला धिंगाणा; VIDEO VIRAL प्रथमेश शिर्के यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण एस.व्ही.जे.सी डेरवण इथं इंग्रजी माध्यमातून झालं. त्यानंतर रत्नागिरी येथील शासकीय ITI मध्ये शिक्षण घेत पुढील पदवीत्तर शिक्षण सांगली व दिल्ली इथं पूर्ण केले आहे. प्रथमेश याचे वडील सैनात नोकरीला होते. मागील वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. आज प्रथमेशने घवघवीत यश मिळवलं आहे. पण, त्यांचं हे यश पाहण्यासाठी त्याचे बाबासोबत नाही. बाबांच्या आठवणीने प्रथमेश आणि कुटुंबीय भावुक झाले होते. तर चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण 3 विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. 713 व्या रँकने सावली येथील देवव्रत वसंतराव मेश्राम परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. देवव्रत सावली येथील विश्वशांती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्व. वसंतराव मेश्राम यांचे चिरंजीव आहे. सावली तालुका आणि जिल्हाभरातून देवव्रत याच्या यशाचे कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे. बार्टीचे 9 विद्यार्थी यावर्षी यूपीएससीत यशस्वी! तर, लॉकडाऊनमधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य सरकारच्या मदतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. सर्व यशस्वी भावी अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व करावे तेवढे कौतुक थोडेच आहे! तुम्हा सर्वांचा गर्व वाटतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीच्या यूपीएससीत यश मिळवलेल्या 9 विद्यार्थ्यांचे कौतुक केलं आहे. बार्टी व राज्य सरकारच्या मदतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन जानेवारी 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लेखी परीक्षा व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये यूपीएससी मार्फत झालेल्या मुलाखती व अन्य चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हे 9 जण भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी होणार आहेत. माइक्रोसॉफ्टने डबल डिस्प्लेचे Laptop आणि Smartphone केले लॉन्च यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रायोजकत्व देण्याऐवजी ऑनलाईन प्रशिक्षण व अन्य मदत केली जात होती. परीक्षेच्या पूर्वतयारी साठी सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.
Published by:sachin Salve
First published: