मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुदिन्याची कापणी करणाऱ्या सलमानचं युपीएससीत यश

पुदिन्याची कापणी करणाऱ्या सलमानचं युपीएससीत यश

दोन एकर कोरडवाहु शेतीवर उदरनिर्वाह चालणाऱ्या या कुटुंबाला मुलाचं शिक्षणंही परवडत नव्हतं. अशावेळी सलमानने मदरशात शिक्षण पूर्ण केलं.

  सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद

  28 एप्रिल : युपीएससी परिक्षेत मराठवाड्यातील मुलांनी चमकदार कामगिरी केलीय. मराठवाड्यातील सात जणांना या परिक्षेत यश मिळालंय. फुलंब्रीच्या शेतकऱ्याचा मुलगा शेख सलमानचं यश डोळ्यांत भरण्यासारखं आहे.

  शेख सलमानच्या मात्यापित्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ईद असल्यासारखं वातावरण आहे. घरी लोकांची सतत ये जा सुरू आहे. हे आनंदी वातावरण आहे शेख सलमानच्या घरचं...औरंगाबादच्या फुलंब्रीतील शेख सलमान याला युपीएससी परीक्षेत 339 वा रँक मिळालाय.

  सलमानला युपीएससी परीक्षेत यश मिळाल्याची बातमी आली तेव्हा सलमान मात्र शेतावर आईसोबत पुदिन्याची कापणी करत होता. दोन एकर कोरडवाहु शेतीवर उदरनिर्वाह चालणाऱ्या या कुटुंबाला मुलाचं शिक्षणंही परवडत नव्हतं. अशावेळी सलमानने मदरशात शिक्षण पूर्ण केलं. खडतर परिस्थितीत मिळवलेलं हे यश म्हणजे नेमकं काय हे तर त्याच्या अक्षरओळख नसलेल्या आई आज्जीला कळतही नाहीये.

  आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडणाऱ्या अनेकांनी  सलमानचा शेख आदर्श घ्यावा.

  First published:
  top videos

   Tags: Upsc exam