LIVE : ठरलं! सेनेचाच मुख्यमंत्री; 3 पक्षांच्या महाविकास आघाडीची पहिली संयुक्त बैठक सुरू

LIVE : ठरलं! सेनेचाच मुख्यमंत्री; 3 पक्षांच्या महाविकास आघाडीची पहिली संयुक्त बैठक सुरू

तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची पहिली संयुक्त बैठक मुंबईत नेहरू सेंटरमध्ये सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत. उद्या ही विकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार का? h

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या दृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची पहिली औपचारिक बैठक मुंबईत नेहरू सेंटर इथे सुरू आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीतून सत्तास्थापनेचा अंतिम तोडगा निघणार की अजून वाट पाहावी लागणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर उद्या म्हणजे शनिवारी शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार, असं सांगितलं जात आहे.

या बैठकीसाठी ठाकरे, पवार, पटेल, खर्गे यांच्यासह राष्ट्रवादीचे अजित पवार, नवाब मलिक, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य आणि मिलिंद नार्वेकरसुद्धा नेहरू सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हेदेखील आधीच या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना -भाजप युतीचं सरकार बहुमत असूनही अस्तित्वात येऊ शकलं नाही आणि तिढा निर्माण झाला. आता पुरेसं संख्याबळ मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापण्याच्या प्रयत्नात आहेत. सत्तावाटपाच्या फॉर्म्युला काय यावरून शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आता या नव्या महाविकास आघाडीत सत्तावाटप कुठल्या फॉर्म्युल्यावर ठरणार याविषयी उत्सुकता आहे. सत्तेच्या समसमान वाटपाबद्दल राष्ट्रवादी आणि काँग्रेस आग्रही असल्याचं बोललं जात आहे. पण मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यात दोन्ही काँग्रेसचा आक्षेप नाही, असं कळतं.

वाचा - ही महाआघाडी टिकणार नाही, सत्तास्थापनेआधीच गडकरींनी वर्तवली भविष्यवाणी

शिवसेनेचाच मुख्यमंत्री असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत निकालाच्या दिवसापासून म्हणत असले, तरी शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या महाविकासआघाडीच्या संयुक्त बैठकीत शिवसेना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार, असं सांगितलं जात आहे.

----

अन्य बातम्या

उल्हासनगर महापालिकेत उलथापालथ, सत्ताधारी भाजपचे नगरसेवक फुटल्याने शिवसेनेचा विजय

पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा, महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड

लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का, कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे झाले महापौर

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 22, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading