राम मंदिरासाठी संघाची मोर्चेबांधणी, 25 नोव्हेंबरला नागपुरात काढणार हुंकार रॅली

राम मंदिरासाठी संघाची मोर्चेबांधणी, 25 नोव्हेंबरला नागपुरात काढणार हुंकार रॅली

अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी कायदा करा असा सल्ला देणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आता राम मंदिरासाठी जनआंदोलन करण्याचं ठरवलं आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 10 नोव्हेंबर : अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी कायदा करा असा सल्ला देणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आता राम मंदिरासाठी जनआंदोलन करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी जागोजागी सभा आयोजित करण्यात येणार आहेत.

संघपरिवारातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा संघटना एकत्र येत २५ नोव्हेंबरला नागपूरसह अयोध्या आणि बेंगळुरूमध्ये एकाच वेळी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

नागपूरच्या रेशिमबाग परिसरात सभा घेण्याचा प्रयत्न आहे पण याच काळात रेशीमबागेत अॅग्रोव्हिजन प्रदर्शन असल्याने शेजारील ईश्वर देशमुख काॅलजेच्या पटांगणात सभा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. साध्वी ऋतुंभरा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

त्यामुळे आता शिवसेनेनंतर राम मंदिर उभं राहावं यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं होतं. त्यासाठी भागवतांनी बाप्पाचा विधिवत अभिषेकही घातला.

अभिषेकादरम्यान मोहन भागवतांनी राम मंदिर लवकर व्हावं यासाठी गुरूजींच्या सूचनेनुसार संस्कृतमध्ये खास मंत्रोच्चारही म्हटले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी याबाबतच ‘न्यूज18 लोकमत’बरोबर बातचीत केली.

दरम्यान, भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमातही राम मंदिर लवकरात लवकर व्हावं, अशी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा गाजणार अशी चिन्ह आहेत. कारण आता या मुद्द्यावरून देशभरात दोन्ही बाजूने मोठी चर्चादेखील होत आहे.

VIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार

First published: November 10, 2018, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading