• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 12 तास उलटले पण कुणीच बॅग नेण्यासाठी आलं नाही, कराड स्थानकावर थरारक घटना VIDEO

12 तास उलटले पण कुणीच बॅग नेण्यासाठी आलं नाही, कराड स्थानकावर थरारक घटना VIDEO

सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या बसस्थानक परिसरात भल्या पहाटे बेवारस प्रवासी बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

  • Share this:
सातारा, 12 डिसेंबर : साताऱ्यातील (satara) कराड बस स्थानकावर बेवारस बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताचघटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले होते. अखेर तासभराच्या तपासानंतर बॅगेत कपडे आणि फराळ आढळून आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या बसस्थानक परिसरात भल्या पहाटे बेवारस प्रवासी बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कराड बस स्थानक समोर असलेल्या तृप्ती लॉज आणि वेलनेस मेडिकल या दुकानांच्या समोरच ही  बेवारस प्रवाशी बॅग सकाळपासून पडून होती. बॅगेला हात लावण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. अखेर दिवसभर बॅग घेऊन जायला कोणी आले नसल्याने संशय आल्याने नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सातारा बॉम्ब शोधक पथकाला याबद्दल माहिती दिली. बॉम्ब शोधक पथकाने काही मिनिटात कराड बसस्थानक गाठले. बॅगेची तपासणी केली. पण घटनास्थळावर बघ्याची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाने बॅगेला निर्जळठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी बॅगेची तपासणी करण्यात आली. काही वेळानंतर बॅग उघडण्यात आली असता बॉम्बशोधक पथकांनी सुटकेचा श्वास सोडला. या बॅगेत कपडे, दिवाळीचा फराळ आढळून आला होता. एखादा प्रवासी आपली बॅग विसरून गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. बॅगेत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून न आल्यामुळे पोलीस आणि स्थानिकांचा जीव भांड्यात पडला.
Published by:sachin Salve
First published: