येत्या 48 तासांत महाराष्ट्राच्या 'या' काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये तयार झाला कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये तयार झाला कमी दाबाचा पट्टा

  • Share this:
    मुंबई, 19 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण थंडी कमी झाली आहे. आकाशातील ढगांमुळे काही गेल्या आठवड्यापर्यंत कोरड्या वातावरणात किंचित आर्द्रता आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. अशातच महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट पसरलं आहे. तर, मनमाड, चांदवड भागात पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 48 तासात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही परिसरात पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. हेही वाचा...कोरोनामुळे स्थगित केलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांबाबत आयोगानं केली मोठी घोषणा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील 48 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल. या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाले. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही नागरिकांनी गर्मीचा सामना करावा लागत आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडी जाणवत होती. मध्यंतरी चंद्रपुरातील तापमान 8, तर शहरातील तापमान 13 अंशांच्या आसपास पोहोचले होते. मात्र, गेल्या आठवड्यात नीरभ्र आणि मोकळ्या आकाशात ढगांनी गर्दी केली आणि तापमानात अचानक वाढ झाली. पुढील काही दिवस हे ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हेही वाचा...एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी तातडीनं मुंबईकडे रवाना दरम्यान, राज्यात गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला होता. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक देखील या पावसानं हिरावून घेतलं होतं. कोरोना काळातील टाळेबंदीमुळे बिघडलेलं आर्थिक चक्र, बोगस बियाणं, कीड, अतिवृष्टी अशा संकटाचा सामना करत टिकवलेलं पीक देखील परतीच्या पावसामुळे शेतातील मातीसह वाहून गेल्यामुळे पुन्हा कसं उभं राहायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता आणखी अवकाळी पावसाचं सावट पसरलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: