शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले शरद पवार, शेतकरी म्हणतात जगायचं कसं?

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले शरद पवार, शेतकरी म्हणतात जगायचं कसं?

पवारांचा दौरा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला मात्र पवारांनी दौरा थांबवला नाही.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, बागलान(नाशिक) 1 नोव्हेंबर : अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्ष, फळांच्या बागा यांचं प्रचंड नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार आज नाशिक जिल्ह्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नाशिक जवळच्या बागलान इथं पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आणि प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पवारांपुढे आपल्या अडचणी मांडल्या. कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, मालाला भाव नाही अशा अस्मानी आणि सुल्तानी संकटात जगायचं कसं असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला. पवारांचा दौरा सुरू असतानाच पाऊस सुरू झाला मात्र पवारांनी दौरा थांबवला नाही.

लग्नानंतरच ताटातूट, नागपूरच्या युवकाची पत्नी अडकली पाकिस्तानात

शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. पवार म्हणाले, अतिवृष्टी मुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. द्राक्ष पिकाच मोठं नुकसान झालंय. कर्जाच बोझा कमी करण अवघड आहे.डाळीबं, कांदा, सोयबीन, भात, मका अशा सर्वच पिकांच नुकसान झालंय. शेतकऱ्यांना जगायचं कसं असा प्रश्न कायम आहे. संकटावर मात करू, मात्र तुम्ही धीर सोडू नका.

सरकारचं काय होतं माहित नाही. तो पर्यन्त केंद्राची मदत घेऊ कर्ज माफीसाठीही प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं. अनेक ठिकाणी बँका कर्ज देत नाही हा प्रश्न गंभीर आहे मुला बाळाचं भविष्य समोर बघा खाजगी सावकारांच कर्ज फेडण्याच्या मदतीसाठी काही नियम नाही. तुम्ही स्वत:ला सावरा मी मदतीसाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे.

जय हो...रोहित पवारांसाठी 28 जेसीबींमधून उधळला गुलाल!

ते पुढे म्हणाले,  मैदान सोडू नका ही विनंती आहे. शेतकऱ्यांना एकरी भरपाई मिळाली पाहिजे. सरकार कडून वेगळ धोरण आखण्याची गरज आहे. सरकार कडून वेळीच मदत न झाल्यास आत्महत्यांच प्रमाण वाढेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 07:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading