19 वर्षीय तरुणावर तिघांनी आळीपाळीने केला अनैसर्गिक अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

19 वर्षीय तरुणावर तिघांनी आळीपाळीने केला अनैसर्गिक अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

19 वर्षीय तरुणाला तिघांनी गोड बोलून शेतात नेले.. बेदम मारहाण केली.. विवस्त्र केले.. नंतर तिघांनी आळीपाळीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना उघड झाली आहे. एवढेच नाही तर आरोपांनी पीडित तरुणाचे अश्लील फोटो काढून मोबाईल कॅमेऱ्यात काढून ते whatappवर शेअर केले.

  • Share this:

बीड, 5 मे- 19 वर्षीय तरुणाला तिघांनी गोड बोलून शेतात नेले.. बेदम मारहाण केली.. विवस्त्र केले.. नंतर तिघांनी आळीपाळीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना उघड झाली आहे. एवढेच नाही तर आरोपांनी पीडित तरुणाचे अश्लील फोटो काढून मोबाईल कॅमेऱ्यात काढून ते whatappवर शेअर केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता केली तर बघ, अशी जीवे मरण्याची धमकी दिली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनने जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे.

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी तिन्ही नराधमांविरोधात भादंवि कलम 377,323 अन्वये तसेच आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत चीड आणणाऱ्या या घटनेतील पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दाताचे ऑपरेशन करताना पुण्यात तरुणीचा मृत्यू, डॉक्टर दाम्पत्य फरार

अशी फुटली घटनेला वाचा...

विशेष म्हणजे या प्रकरणात पीडित मुलासोबत अत्याचार करतानाचे फोटो आरोपींनी काढले.अत्याचाराचे फोटो whatapp ग्रुपवर टाकल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. नराधमांना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी केली जात आहे.

VIDEO: पार्किंगच्या कारणावरून महिलांची तुंबळ हाणामारी

First published: May 5, 2019, 3:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading