मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mp Rahul shewale : शिंदे गटात मोठी जबाबदारी मिळवणाऱ्या खासदारावर महिलेचे गंभीर आरोप, पत्नीने दिले सडतोड उत्तर

Mp Rahul shewale : शिंदे गटात मोठी जबाबदारी मिळवणाऱ्या खासदारावर महिलेचे गंभीर आरोप, पत्नीने दिले सडतोड उत्तर

बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. यावर बंडखोर खासदार शेवाळे यांच्या पत्निने त्या आरोपांचे सडेतोड उत्तर दिले आहे.

बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. यावर बंडखोर खासदार शेवाळे यांच्या पत्निने त्या आरोपांचे सडेतोड उत्तर दिले आहे.

बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. यावर बंडखोर खासदार शेवाळे यांच्या पत्निने त्या आरोपांचे सडेतोड उत्तर दिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 19 जुलै : 40 आमदारांना घेऊन बंडखोरी करत शिवसेनेत फुट पाडली. दरम्यान आमदारांना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा सुरुंग लावला. 12 खासदार फोडून नवा गट स्थापन करण्याची हालचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. यावर बंडखोर खासदार शेवाळे यांच्या पत्निने त्या आरोपांचे सडेतोड उत्तर देत खंडण केले आहे. प्रसिद्धी पत्रक काढत त्यांनी माहिती दिली आहे.

बंडखोर खासदार शेवाळे यांच्या पत्निने केलेले आरोप पत्रात त्या म्हणतात कि, खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे.

हे ही वाचा : 'त्या' कामासाठी 10 वर्षापूर्वीच सेना -राष्ट्रवादी एकत्र येणार होते पण.., शिवसेनेच्या माजी खासदाराचा गौप्यस्फोट

सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती. याची दखल घेऊन 11 जुलै 2022 रोजी सदर महीलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.

सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे 80 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

हे ही वाचा : शरद पवार आणि अजितदादांनी शिवसेना फोडली, रामदास कदमांचा थेट आरोप

 प्रसिद्धी माध्यमांना मी नम्र विनंती करते की, खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते! असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Rahul shewale, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)