पुणे, वैभव सोनवणे 18 मे : रेल्वेला अपघात करण्याचा धक्कादायक कट सध्या पुण्यात शिजत असल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांमध्ये रेल्वे रूळांवर लोखंडी तुकडे ठेवून मोठा अपघात घडवण्याचे प्रयत्न झाले. पुणे रेल्वे पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मागील 3 ते 4 महिन्यामध्ये किमान 8 ते 10 वेळेला असे प्रकार समोर आले. पण, लोको पायलट आणि रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघाताचे कट उधळले गेले आहेत. याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. पुणे पोलिस देखील आता अधिक सतर्क झाले आहेत.
एप्रिलमध्ये हातकणंगले परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांनी लोखंडी तुकडे रेल्वे रूळावर ठेवून अपघात घडवण्याचा कट रचला. पण, सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. तर, काही दिवसांपूर्वी तळेगावमध्ये कामशेत येथे हैद्राबाद - मुंबई एक्सप्रेसलादेखील अपघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
रेल्वे प्रवास सुरक्षित?
हजारों लोकं रोज पुणे रेल्वे विभागात प्रवास करतात. पण, अशा घटना वाढत असल्यानं प्रवास खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनानंदेखील रेल्वे रूळावर लोखंडी तुकडे ठेवणारे व्यक्ति किंवा संशायित व्यक्ति दिसल्यास पोलिसांना कळवा असं आवाहन केलं आहे. या लोकांना पकडणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे मोठं आव्हान रेल्वे पोलिस, प्रशासनापुढं आहे.
VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदींनी घेतलं केदारनाथाचं दर्शन