Home /News /maharashtra /

निवडणुकीआधीच कार्यकर्त्यांच्या तोंडचं पळालं पाणी, उमेदवारानं दिलेलं 7 किलो मटण गेलं चोरीला

निवडणुकीआधीच कार्यकर्त्यांच्या तोंडचं पळालं पाणी, उमेदवारानं दिलेलं 7 किलो मटण गेलं चोरीला

Crime in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी याठिकाणी एक मजेदार घटना घडली आहे. येथील एका उमेदवाराच्या पतीने कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी आणलेल्या सात किलो मटणावर अज्ञात चोरट्यानं डल्ला मारला (7 kg Mutton theft) आहे.

    चंद्रपूर, 15 जानेवारी: निवडणुकीच्या काळात सर्वात जास्त मजा कार्यकर्त्यांची असते. आपल्याला मत मिळावीत आणि कार्यकर्ते खूश राहावेत, यासाठी उमेदवारांकडून अनेक प्रलोभनं दिली जातात. दारू, मटण आणि चिकण पार्टी देणं तर ठरलेलंच असतं. पण चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिपरी याठिकाणी एक मजेदार घटना घडली आहे. येथील एका उमेदवाराच्या पतीने कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी आणलेल्या सात किलो मटणावर अज्ञात चोरट्यानं डल्ला मारला (7 kg Mutton theft by unknown man) आहे. त्यामुळे ऐन रंगात आलेल्या पार्टीचा बेरंग झाला आहे. मटण चोरीला गेल्यानं कार्यकर्त्यांना शाकाहारी भाजीवर समाधान मानावं लागलं आहे. हा प्रकार समोर येताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. तसेच मटण चोरीचा प्रकार विरोधी पक्षातील कोणीतरी केला असावा, असा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरीत नगर पंचायत निवडणुकीची धामधुम सुरू आहे. संबंधित निवडणुकीत उमेदवार असणाऱ्या एका महिलेच्या पतीने कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी दारू आणि मटणाची पार्टी ठेवली होती. सर्व साहित्य घेऊन कार्यकर्ते एका निर्जन स्थळी गेले होते. हेही वाचा-पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा तुंबळ हाणामारी, टोळक्यानं लोखंडी सळईने केले वार याठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम दारू पिण्याचा बेत ठरवला. दारू प्यायल्यानंतर मटणाची भाजी करायची असं नियोजन ठरलं होतं. त्यामुळे सर्व कार्यकर्ते दारू रिचवायला गेले. दारू ढोसण्याच्या नादात मटण आणि इतर साहित्य घटनास्थळीच पडून राहिलं. दारू प्यायल्यानंतर जेव्हा कार्यकर्ते पुन्हा घटनास्थळी आले, तेव्हा तेथील मटण गायब होतं. तेल, तिखट-मसाला आदी साहित्य मात्र त्याठिकाणीच पडून होतं. हेही वाचा-कानाचा चावा घेत पाठीत खुपसला स्क्रू ड्रायव्हर, पुण्याला हादरवणारी घटना फक्त मटणच गायब झाल्याने उमेदवार महिलेच्या पतीसह कार्यकर्त्यांची निराशा झाली. या प्रकारानंतर कार्यकर्त्यांना शाकाहारी भाजीवर समाधान मानावं लागलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गोंडपिपरी शहरातील प्रभाग 15 मध्ये एकच हशा पिकला आहे. विरोधी पक्षातील कोणीतरी मटण चोरून नेलं असल्याचा आरोपी संबंधित कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chandrapur, Crime news

    पुढील बातम्या