Home /News /maharashtra /

पुणेरी माणसाच्या लग्नाची अनोखी गोष्ट, सॅनिटायझर टनेल ओलांडून नवरी निघाली सासरी!

पुणेरी माणसाच्या लग्नाची अनोखी गोष्ट, सॅनिटायझर टनेल ओलांडून नवरी निघाली सासरी!

नवरदेवानं नवरीच्या घरी जाण्यासाठी पुणे पोलिसांचा रितसर डिजीटल पासही काढला होता.

पुणे, 29 एप्रिल : 'पुणे तिथे काय उणे..'असं उगाच म्हटलं जात नाही. कोणत्याही अडचणीत सापडल्यावर पुणेकर काय शक्कल लढवतील याचा नेम नाही.  यंदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची अनेक इच्छुकांची अपेक्षा ती अपेक्षाच राहिली आहे.  पण, आज पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात लॉकडाउनचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. अशा परिस्थितीत एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. नवरदेव हर्षल पवार हा ग्रीन कोरोना झोन असलेल्या धनकवडीचा राहणारा आहे. तर नवरी मुलगी रेश्मा पवार ही रेड कोरोना झोन असलेल्या कोंढवा परिसरातील राहणारी आहे. हेही वाचा - शाब्बास! नगरच्या इंजिनिअर तरुणाने बनवलं टाकावू वस्तुंपासून JIVA व्हेंटिलेटर पण, सर्व नियम आणि सोशल डिस्टसिंग पाळून नवरदेव नवरीच्या घरी पोहोचलाच.  नवरीच्या घरी सोशल डिस्टसिंग पाळून लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्याला दोन्ही बाजूची पाच-पाच माणसं हजर होती. नवरदेवानं नवरीच्या घरी जाण्यासाठी पुणे पोलिसांचा रितसर डिजीटल पासही काढला होता. लग्न लागल्यानंतर नवरा नवरी काञज चौकातून धनकवडीत आले. त्यावेळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पीआय विष्णु ताम्हाणे नवदाम्पत्याला पाच सॅनिटायझर बॉटल्स, 5 मास्क आणि हँड ग्लोज असा हटके रुखवत दिला. हेही वाचा - VIDEO: या मराठी कलाकाराला वाटलं लॉकडाऊन संपला, घराबाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात... तर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी जोडप्याची बिदाई केली. यावेळी नवरदेवाची गाडीही सॅनिटायझरने फवारण्यात आली. तसंच नवदाम्पत्याला खास सॅनिटाईज फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. असा अनोखा आणि  कायम आठवणीत राहणारा लॉकडाउनमधला लग्नाचा सोहळा अखेर संपन्न झाला. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या