मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे अनोखे मंदिर; पाहा कसे असेल शिवरायांचे हे मंदिर

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे अनोखे मंदिर; पाहा कसे असेल शिवरायांचे हे मंदिर

2018 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन होऊन या कामाचा शुभारंभ झाला. कोरोना महामारी च्या काळात अनेक अडचणींचा सामना करत या मंदिराचे आतापर्यत काही काम पूर्ण झाले आहे.

2018 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन होऊन या कामाचा शुभारंभ झाला. कोरोना महामारी च्या काळात अनेक अडचणींचा सामना करत या मंदिराचे आतापर्यत काही काम पूर्ण झाले आहे.

2018 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन होऊन या कामाचा शुभारंभ झाला. कोरोना महामारी च्या काळात अनेक अडचणींचा सामना करत या मंदिराचे आतापर्यत काही काम पूर्ण झाले आहे.

ठाणे, 6 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वाडा रस्त्यावरील निसर्गरम्य अशा मराडे पाडा या ठिकाणी दीड एकर जागेत साकारण्यात येत आहेत. शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा (Chhatrapati Shivaji Maharaj Temple) संकल्प केला गेला. त्यानंतर 2018 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन होऊन या कामाचा शुभारंभ झाला. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात अनेक अडचणींचा सामना करत या मंदिराचे आतापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

कसे असणार हे मंदिर?

या मंदिराची रचना किल्ल्याच्या तटबंदी सारखी असून त्यामध्ये भव्य मंदिर उभारणे सुरू असून तटबंदीच्या आतील बाजूस 40 कप्पे आहेत. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र ऐतिहासिक शिल्पाच्या माध्यमातून साकारली जाणार आहे.

प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, मिरवणूक काढतात. परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पुरताच मर्यादित न राहता काही तरी वेगळे करण्याच्या दृष्टीकोनातून संस्थेच्या मनात आला आणि त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्याचा ठरवलं. त्यासाठी शिव प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत जागा खरेदी केली तसेच आणि स्थानिक लोकांना देखील यासाठी भरपूर मदत केली.

काही राजकीय नेत्यांनी देखील देणगीच्या स्वरूपात मदत केली त्यामुळे आज 80 टक्के हे मंदिराचे काम पूर्ण झालेला आहे. त्या काळामध्ये हे मंदिर पूर्णत्वास येईल. हे मंदिर असून सर्वांसाठी शक्ती पीठ असणार आहे आणि या ठिकाणी अनोखी ऊर्जाही तरुणांना मिळणार आहे.

अन् विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा...

सध्याच्या तरुणांना शिवचरित्राची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन आणि त्यांच्या काळात असणाऱ्या कला तसेच त्यांचे गुण हे तरुणांना गरजेचे आहे त्यासाठी हे मंदिर त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी तरुणी मुली आणि अनेक महिलांना स्वतःची सुरत शेतीसाठी योग्य ते मार्गदर्शन आणि आत्म सुरक्षेसाठी माहिती दिली जाणार आहे. या ठिकाणी दानपट्टा सारखे अनेक स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना या मंदिराचा पुरेपूर फायदा होणार आहे.

स्थानिकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे आमच्या गावात होत आहे याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे. आमचं गाव हे थोड्याच कालावधीत पूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध झालं आहे. या अगोदर आमच्या गावाला कुठेही ओळख नव्हती. मंदिरामुळे गावचा विकास देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. या मंदिरामुळे आमच्या गावातून संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज हे जवळून पाहायला मिळणार आहेत. महाराजांचा संपूर्ण इतिहास हा तरुणांना समजणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

निश्चितच या मंदिरामुळे संपूर्ण गावचा विकास होणार आहे या गावाला संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख मिळणार आहे. त्यामुळे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून हे शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर थोड्याच दिवसात साकारण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Bhiwandi, Chhatrapati shivaji maharaj, Thane