Home /News /maharashtra /

साताऱ्यात निसर्गाचा अनोखा चमत्कार, चक्क बोकड दूध देऊ लागलं, पाहा VIDEO

साताऱ्यात निसर्गाचा अनोखा चमत्कार, चक्क बोकड दूध देऊ लागलं, पाहा VIDEO

सातारा जिल्ह्यातील एळीव गावच्या अंकुश जाधव यांनी पाळलेल्या बोकडमधील एक बोकड हा चक्क दूध देतोय. या बोकडचं नाव लक्ष्या असं आहे.

सातारा, 3 जुलै : काही गोष्टी अविश्वसनीय अशा असतात. आपला अशा गोष्टींवर विश्वास बसणारच नाही, अशा त्या गोष्टी असतात. पण सत्य जे असतं त्याला आपल्याला सामोरं जावंच लागणार. सत्य आपल्याला मानावंच लागतं. कारण जे सत्य आहे ते आपल्या न मानण्याने बदलणार नाही. त्यामुळे अशा गोष्टींवर सहसा पटकन आपला विश्वास बसत नाही. पण ते सत्य असल्याने आपल्याला नाईलाजे त्यावर विश्वास ठेवावा लागतो. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे साताऱ्यात निसर्गाचा अनोखा चमत्कार समोर आला आहे. सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील एळीव गावात एका शेतकऱ्याचं बोकड चक्क दूध देऊ लागलंय. खरं म्हणजे हे ऐकायला आश्चर्यकारक वाटत असलं तरी हे खरं आहे. सातारा जिल्ह्यातील एळीव गावच्या अंकुश जाधव यांनी पाळलेल्या बोकडमधील एक बोकड हा चक्क दूध देतोय. या बोकडचं नाव लक्ष्या असं आहे. हा बोकड दूध देत असल्याची बातमी पंचक्रोशित समजल्यानंतर दूर-दूरच्या गावाकडची माणसं बोकड पाहण्यासाठी गावात गर्दी करत आहेत. जे नागरिक बोकडला दूध देताना पाहत आहेत ते निसर्गाच्या या चमत्काराबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत. दूध देणारा लक्ष्या बोकड सध्या खटाव तालुक्यात चांगलाच चर्चेत आला आहे. अंकुश जाधव हे गेल्या 27 वर्षांपासून शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. जाधव यांच्या घरी सध्या बारा शेळ्या आहेत. त्यातला हा लक्ष्या बोकड. हा बोकड गेल्या दोन महिन्यांपासून दूध द्यायला लागल्याचं जाधव कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी परसली. त्यानंतर आजूबाजूच्या गावात ही बातमी पसरली. (एकनाथ शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत मोठा निर्णय) दरम्यान, बोकडाला दूध येणं ही नैसर्गिक प्रक्रिया नाही. हार्मोन्सच्या बदलामुळे हा प्रकार घडत असतो. हे दूध नसून दुधासारख लिक्विड आहे आणि ते पिण्यायोग्य नसतं याला कोणीही ईश्वरी चमत्कार समजू नये, असं पशुवैद्यकीय तज्ज्ञांच म्हणणं आहे. खरंतर अशा घटना लाखातून एक होतात. बोकडाचं दूध देणे हे त्यापैकी एक आहे. पण एळीव गावातील शेतकऱ्यांसाठी हे चमत्कारापेक्षा काही कमी नाही.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Satara, Satara news

पुढील बातम्या