• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बहिणीला भावाची अनोखी भेट, भाऊबीजेला गावी जाता आले नाही म्हणून...

बहिणीला भावाची अनोखी भेट, भाऊबीजेला गावी जाता आले नाही म्हणून...

कोरोनाचे संकट असल्यामुळे भाऊबीज एकत्रितपणे साजरी करण्यावर मर्यादा आल्या आहेत.

  • Share this:
भिवंडी, 16 नोव्हेंबर : बहीण आणि भावाच्या नाते अधिक घट्ट करणारे सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज. यंदा मात्र देशभरात कोरोनाचे संकट असल्यामुळे भाऊबीज एकत्रितपणे साजरी करण्यावर मर्यादा आल्या आहेत. अशातही बिहारला गावी जाता आले नाही म्हणून एका भावाने डोक्यावरील केसात 'हॅपी भाईदुज' असे अक्षर कोरून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने दोन्ही बहिणींचा आशीर्वाद घेतला. शंकरकुमार साहू असं या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील गया जिल्ह्याचा रहिवाशी आहे. सध्या तो भिवंडीतील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करत भिवंडीतील हनुमान नगर परिसरात गेल्या 9 वर्षांपासून राहतो. गेल्या 7 महिन्यात 7 वेळा डोक्यावरील केसात अक्षर कोरून कोरोना विषयी जनजागृती कोरोनाच्या काळात सुरुवातीला भिवंडीत प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळीही या तरुणाने लॉकडाऊन काळात डोक्यावरील केसात विविध प्रकारचे संदेश देणारे अक्षर कोरले होते. त्याने गेल्या 7 महिन्यात 7 वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीसाठी अक्षरे कोरून सकाळ, संध्याकाळी नागरिकांना कोरोनापासून बचाव कसा करावा असे संदेश देत होता. शंकरकुमार याला तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोघीही बिहार मधील गया जिल्ह्यात राहतात, तर एका बहिणीचे निधन झाले. शंकरकुमार सांगतो की, भिवंडीत वर्षभर काम करीत असताना केवळ मूळगावी बहिणीसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी दरवर्षी जात होतो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे जाता आले नाही. त्यामुळे सातव्यांदा डोक्यावरील केसात बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी हॅपी भाईदुज अक्षरे कोरली आणि व्हिडिओ कॉलिंग करून बहिणींचे आशीर्वाद घेतल्याचे त्याने सांगितले.
Published by:Akshay Shitole
First published: