केंद्रीय मंत्र्याचा पाहा तो VIDEO, ज्याने रावसाहेब दानवे वादाच्या भोवऱ्यात सापडणार

केंद्रीय मंत्र्याचा पाहा तो VIDEO, ज्याने रावसाहेब दानवे वादाच्या भोवऱ्यात सापडणार

अजब दाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत काय म्हणाले वाचा सविस्तर

  • Share this:

जालना, 10 डिसेंबर : कृषी बिल रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून राजधानी दिल्लीमध्ये नव्या तीन कृषी धोरणांविरोधात आंदोलन सुरू आहे. कृषी बिल रद्द करावं की नाही यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता रावसाहेब दानवेंनी देखील उडी घेतली असून त्यांनी अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या अजब दाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC च्या माध्यमातून आधी मुस्लीम बांधवांची दिशाभूल केली पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कान भरण्याचं काम सुरू आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं सांगून त्यांचे कान भरण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केला आहे.

हे वाचा-शेतकऱ्यांचं आंदोलन: पवार, राहुल गांधी राष्ट्रपतींना भेटले, मोदी सरकारवर हल्लाबोल

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कोलते टाकळी इथे आरोग्य केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान दानवे यांनी हे अजब विधान करत पाकिस्तान आणि चीनवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, 'जे आंदोलन सुरू आहे ते शेतकर्‍यांचे नाही. चीन आणि पाकिस्तानचा या आंदोलनामागे हात आहे. CAA आणि NRC वरून या पूर्वी मुस्लीम बांधवांना चिथवण्यात आलं मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. NRC येत आहे 6 महिन्यात मुस्लिमांना देश सोडावा लागेल असं सांगण्यात आलं होतं मात्र NRC आणि CAA आल्यानंतर कुठल्या मुस्लीम बांधवांना देश सोडवा लागला असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचा-कोरोनाची लस इतक्यात नाहीच; केंद्रानं जाहीर केला मोठा निर्णय

दुसरीकडे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत असून बुधवारी केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांच्या वाहनांचा ताफा आज (9 डिसेंबर) उत्तर प्रदेश पोलिसांनी यूपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखला. ग्वालियर येथून भरतपूर मार्गावरुन जाण्यासाठी बच्चू कडु यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 10, 2020, 7:40 AM IST

ताज्या बातम्या