राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार, केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने खळबळ

राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार, केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने खळबळ

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : राज्यातील सत्तासंघर्ष नाट्यमयरित्या संपल्यानंतर आता ठाकरे सरकार स्थापन झालं. आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याच्या आधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या यानंतर आता आठवलेंच्या या वक्तव्यानंतर आणखी कोणता भूकंप होणार याचीच चर्चा सुरू आहे.

रामदास आठवले म्हणाले की, एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप येऊन गेला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भूकंप आला. पुढेही कोणता ना कोणता भूकंप येईल जो आपण पाहू. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने भूकंपाचे आहेत.

विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. युतीला बहुमत असतानाही शिवसेनेनं सवता सुभा मांडल्यांन भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आलं नाही. त्यानंतर एक महिनाभर सत्तेची गणितं जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू झाली होती.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्तेसाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या. यात युती तोडल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चेला सुरुवात केली होती. त्यांची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक पहाटेच्या वेळी शपथ घेतल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला होता. अखेर 72 तासांत फडणवीसांचे अल्पजीवी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले.

Published by: Suraj Yadav
First published: December 16, 2019, 7:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading