मुंबई, 10 जानेवारी : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. आज देखील आम्ही मित्र पक्ष म्हणुन भाजप बरोबर आहोत. भाजप बरोबर शिंदे यांची मैत्री झाली. यामध्ये रामदास आठवले कार्यरत होते. शिंदे यांची जबाबदारी होती की, हा गट का येतो हे सांगण्याची. मित्र पक्ष म्हणुन आम्ही भाजपसोबत आहोत. मात्र, हा गट घेऊन आमच्यासोबत या चळवळीतील लोक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, अशी नाराजी आरपीआय आठवले गटाचे अविनाश महातेकर यांनी केली आहे.
तसेच आरपीय मधील गट घेण्याआधी आमच्याशी बोलले पाहिजे होते. जोगेंद्र कवाडे यांचा पक्ष प्रवेशाबाबत आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. कवाडे सरांना यायचं होतं तर रामदास आठवले यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे होती, असेही आरपीआय आठवले गटाचे अविनाश महातेकर म्हणाले.
'जे टीका करत होते त्यांनाच सोबत घेतलं' -
जे लोक टीका करत होते तेच लोक आता पक्ष प्रवेश करत आहेत. प्रकाश आंबेडकरांना आणि ठाकरे गटाला चांगलाच फायदा होईल ते निवडणुकीत दिसेल पहायला मिळेल. आम्हाला त्यांची चिंता नाही. आम्हाला त्यांच्यामुळे काहीही फटका बसणार नाही. स्वबळावर लढायची वेळ आली तर आम्ही तीसुद्धा तयारी केली आहे. आरपीआयला सुद्धा पदे मिळाली पाहिजे. मंत्री पद, महामंडळ, जिल्हा नियोजनाबाबत आमची अपेक्षा आहेच. आम्ही मित्र पक्ष आहोत, असे म्हणत त्यांनी मंत्री पद, आणि इतर बाबींबाबत मागणी केली आहे.
हेही वाचा - Sharad pawar health update : शस्त्रक्रिया यशस्वी, शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची 4 जानेवारीला संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युतीची घोषणा करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं. राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. लोकांमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत चांगली भावना आहे. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले. या धडाकेबाज निर्णयानं प्रभावीत होऊनच आपण ठरवलं युती करायची तर ती फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेशीच असं कवाडे यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.