मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेने कामात अडथळा आणल्यास..., नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांना तिखट शब्दात इशारा

शिवसेनेने कामात अडथळा आणल्यास..., नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांना तिखट शब्दात इशारा

शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करत आहेत, त्यामुळे अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशाप्रकारे शिवसेनेने कामात अडथळा आणल्यास कामं मंजुर करण्याबाबत मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल असं गडकरी म्हणाले

शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करत आहेत, त्यामुळे अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशाप्रकारे शिवसेनेने कामात अडथळा आणल्यास कामं मंजुर करण्याबाबत मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल असं गडकरी म्हणाले

शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करत आहेत, त्यामुळे अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशाप्रकारे शिवसेनेने कामात अडथळा आणल्यास कामं मंजुर करण्याबाबत मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल असं गडकरी म्हणाले

पुढे वाचा ...

मुंबई, 14 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari Letter to Maharashtra CM) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रामुळे खळबळ माजली आहे. महाराष्ट्रीतील राष्ट्रीय महामार्गांच्या कामाबाबत त्यांनी इशारा देत हे स्फोटक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करत आहेत, त्यामुळे अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून कामं बंद होत आहे. असंच चालत राहिलं तर राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजुर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा नितीन गडकरींनी या पत्रातून दिला आहे.

वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत असल्याचं या पत्रात गडकरींनी नमुद केलं आहे. हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत की नाही मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल, अशा तिखट शब्दात गडकरींनी पत्रात या परिस्थितीबाबत मत मांडलं आहे.

Nitin Gadkari Letter to CM Uddav Thackeray

वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आठ दिवसापूर्वी रा.मा.क्र.753 सी नागपूर ते औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे कामं बंद पाडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कंत्राटदाराला मारण्याची धमकी  देऊन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान खासदार भावना गवळी याच्या आदेशाने हे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये राष्ट्रीय मार्गाच्या कामात स्थानिक शिवसेना अडथळा निर्माण करत आहे असे थेट पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

हे वाचा-केवळ धारावी नाही अख्ख्या मुंबईने जिंकला लढा,संपूर्ण मुंबापुरी कंटेनमेंट झोन फ्री

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाची कामं रखडली असून याचं कारण शिवसेना कार्यकर्त्यांनी कामं थांबवली असल्याची माहिती मिळाल्याचं गडकरी म्हणाले. यासंदर्भात गडकरींनी पत्रामध्ये काही महत्त्वाची उदाहरणं देऊन या परिस्थितीसंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल असं म्हटलं आहे.

>>अकोला आणि नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज 2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (12 किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे

Nitin Gadkari Letter to CM Uddav Thackeray

>>या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

हे वाचा-तुमच्या कन्फर्म रेल्वे तिकीटावर दुसरा व्यक्तीही करू शकतो प्रवास, पाहा प्रोसेस

>>पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

>>असंच सुरू राहिल्यास वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामं मंजुर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशाराच गडकरी यांनी दिला आहे. ही कामे डिस्कोप केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे

First published:

Tags: Nitin gadkari, Uddhav thackeray