मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : ...तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, नारायण राणेंचं मोठं विधान

Dasara Melava : ...तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, नारायण राणेंचं मोठं विधान

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 ऑक्टोबर : शिवसेनेचा दसरा मेळावा येत्या 5 ऑक्टोबरला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट या दोघांचा वेगवेगळा मेळावा होत आहे. यानिमित्ताने राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले नारायण राणे -

उद्धव ठाकरेंनी मला दसरा मेळाव्याला आमंत्रण दिले तर जाईल. पण मला ते देणार नाहीत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे, अडीच वर्षे या

राज्याला ज्यांनी मागे नेले त्यांचे नाव घ्यायचे नाही आणि जे पक्ष त्यांना पाठींबा देत आहेत त्यांची अवस्था सध्या काय आहे. मग ते काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, या शब्दातही त्यांनी निशाणा साधला. त्यांच्याकडे उमेदवार राहिलेले नाहीत. सर्व शिंदे गटात गेले आहेत. आता भावानेचा विचार करून निवडणूक लढत आहेत, या शब्दात त्यांनी अंधेरीतील पोटनिवडणूकीवरुन निशाणा साधला.

ते म्हणाले, जनता भावनेवर मतदान करणार नाही. तर विकासावर मतदान होईल. निवडणुकी आधी चिन्हाचा निर्णय होईल, असेही ते म्हणाले. तर देशद्रोही यांच्यावर कारवाई होत राहील, आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी पुरावा दाखवला आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Dasara Melava : शिवसेनेचा तिसरा टीझर प्रदर्शित, आम्ही त्याच लढाईची वाट पाहत आहोत म्हणत ठाकरेंची सिंहगर्जना...

 दरम्यान, शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याआधी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यामुळे आता मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा दसरा मेळावा होईल. या मेळाव्याची दोन्ही गटांकडून जोरदार तयारी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे.

First published:

Tags: Narayan rane, Uddhav Thackeray