मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस, पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस, पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग, 29 डिसेंबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना सिंधुदुर्गातील कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस स्टेशनला हजर राहण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे नॉट रिचेबल असताना आता पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली आहे. (Union Minister Narayan Rane received notice from Kankavali Police)

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस बाजवण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी चौकशीसाठी हजर राहणेबाबत ही नोटीस आली आहे. नोटीसनुसार, आज दुपारी 3 वाजता पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली आहे.

काल पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नितेश राणेंचा ठावठिकाणा विचारला असता ठिकाण सांगायला मी काय मूर्ख आहे का ? असे विधान केले असल्याचा नोटीसीत उल्लेख केला आहे.

वाचा : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर कोर्टात काय घडलं? सरकारी वकिलाचा गंभीर आरोप

नोटीसवर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

कणकवली पोलिसांनी नोटीस नारायण राणेंना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी फोनवर प्रतिक्रिया देत म्हटलं, मला कोणत्याही स्वरूपाची नोटीस प्राप्त झाली नाही. मी केंद्रीय मंत्री आहे. मला अशी नोटीस पाठवतां येत नाही.

नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे? 

28 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितेश राणे कुठे आहेत? तेव्हा नारायण राणे यांनी संतप्त होत म्हटलं, कुठे आहेत हे सांगायला मला काय तुम्ही मुर्ख माणूस समजलात का? कुठे आहेत हे जरी मला माहिती असेल तरी मी सांगणार नाही. तुम्हाला का सांगावं? असा सवालही नारायण राणेंनी केला.

पत्रकार परिषदेत नारायण राणे संतप्त

नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना मांजराचा आवाज काढला. यावर कालच्या प्रश्नावर विचारले असता नारायण राणे संतप्त झाले आणि म्हणाले, विधिमंडळात कुठे केलं? पायरीवर बोलायला काही बंधने आहेत का? असंसदीय शब्द आहेत का? कोण अजित पवार मी ओळखत नाही अजित पवारला. या राज्यातील लोकांच्या कोट्यवधी रुपयांचा आरोप आहे त्यांचा रेफरन्स काय देता तुम्ही?

एका आमदारासाठी तुम्ही एवढी मोठी यंत्रणा लावताय? एवढा मोठा पोलीस फौजफाटा कशासाठी? मांजरीचा आवाज काढल्यास एवढा राग का यावा? आदित्य ठाकरे आणि मांजराचा काही संबंध आहे का? मला म्हणायचंय त्यांचा आवाज तसा नाहीये. पण मांजरीचा आवाज काढल्याने राग का यावा? असे सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केले.

First published:

Tags: Narayan rane