मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''संजय राऊत रात्री करायचं ते दिवसा करतात, लिखाण करताना भान नसतं'', नारायण राणेंचा हल्लाबोल

''संजय राऊत रात्री करायचं ते दिवसा करतात, लिखाण करताना भान नसतं'', नारायण राणेंचा हल्लाबोल

नारायण राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्लाबोल केला.

नारायण राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्लाबोल केला.

नारायण राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्लाबोल केला.

मुंबई, 05 नोव्हेंबर: काही वेळापूर्वी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे यांनी महाविकास आघाडी (maha vikas aghadi Government) सरकारवर टीका केली आहे. तसंच नारायण राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्लाबोल केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्यानं संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

माननीय संजय राऊतांचे अग्रलेख वाचले. अपक्ष उमेदवार हा दादरा नगरहवेलीत जिंकली. ती आम्ही जिंकली जिंकली असा डंका पिटला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतात. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

मला वाटतं रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्यानं राऊतांना भान राहत नाही. त्यांना लिखाण करताना भान नसतं, अशा शब्दात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

तुम्ही जे जिंकून आलात ते मोदींच्या भरोश्यावर

तुम्ही जे जिंकून आलात ते मोदींच्या भरोश्यावर. आधी युती केली आणि मग गद्दारी केली. मिडीयाने काही लोकांना सांभाळून घेतलं, असंही राणे म्हणालेत. मोदी सरकार बहुमतात आहे, तुम्ही तिथे धडक मारणार, पण धडक कशी असते ते माहीत नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसेल तिकडे, असा हल्लाबोलही राणेंनी पत्रकार परिषदेत केला आहे.

हेही वाचा- ...म्हणून अजित पवारांनी केली Corona Test, रिपोर्ट येणं बाकी; शरद पवारांची माहिती

भाजपवर, मोदींवर टीकेचा भडिमार करतायत, संपलं आता यांचं म्हणे. आता तुम्ही जे 56 आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडणून आलेले आहात. अन्यथा आठच्यावर जात नाहीत तुम्ही, असाही टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.

First published:
top videos

    Tags: Narayan rane, Sanjay Raut (Politician)