मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /"बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धव ठाकरे...", नारायण राणेंची मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार टीका

"बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धव ठाकरे...", नारायण राणेंची मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार टीका

सरकार दीड महिन्यात पडेल, या आरोपावर ते शुभ बोला असे म्हणाले.

सरकार दीड महिन्यात पडेल, या आरोपावर ते शुभ बोला असे म्हणाले.

सरकार दीड महिन्यात पडेल, या आरोपावर ते शुभ बोला असे म्हणाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. वरळीत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिंदे गट बरेचशे धक्के शिवसेनेला देत आहे. त्यामुळे काळजी एवढीच आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना किती सांभाळू शकेल हा प्रश्न आहे.

शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे, या शब्दात त्यांनी प्रहार केला. तसेच 100 खोके मातोश्रीला जात होते, असा आरोप करण्यात आला आहे. यावर नारायण राणे म्हणाले की, याबाबत मला माहित नाही. मी दुजोरा दिला नंतर कोर्ट कचेऱ्या सुरू होऊ शकतात. त्यामुळे त्यांना माहित असेल म्हणूनच त्यांनी आरोप केला असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदावरुन टीका -

दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, "माननीय ब बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक व्यक्ती नाही. त्याला महाराष्ट्राच्या जनतेची काही माहिती नाही. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि भाजपासोबत युती करून मोदींच्या नावावर मतं मागितली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केवळ मुख्यमंत्री पदासाठी गेला गद्दारी केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी गद्दारी केली", या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

तर राज्य सरकार दीड महिन्यात पडेल, या आरोपावर ते शुभ बोला असे म्हणाले. दरम्यान, नारायण राणे दसरा मेळाव्यावरुनही टीका केली. ते म्हणाले, दसऱ्याला शिवसेनेचे पितळ उघडे पडेल. शिवसेना आता अस्तित्वात नाही. उरलेले आमदारी लवकरच सोडून शिंदे गटात जातील, असा दावा त्यांनी केला. तर उद्धव ठाकरेंची स्मरणशक्ती वीक झाली आहे. हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. त्यामुळे कॅसेट शिंदे पाठवत आहे आणि मातोश्री वाले ते पाहतील की नाही ते माहित नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा - Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या मनातली खदखद अखेर आली बाहेर, चांगल्या खात्याचा मोह आवरेना

दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरुर म्हणाले होते की, 2024मध्ये काँग्रेस परतेल. यावरुन नारायण राणे यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, ते थरथरत होते का, काँग्रेसला मायबापच नाही. काँग्रेस संपली आहे. आता फक्त एकच नाव घ्या, भारतीय जनता पक्ष. आम्ही औषधाला राष्ट्रवादी, जनता दल असे एक दोन एक दोन पक्ष ठेवू, अशी टीकाही त्यांनी केली.

First published:
top videos

    Tags: Maharashtra politics, Narayan rane, Uddhav Thackeray