मालेगाव, 08 नोव्हेंबर : मनमाड-मालेगाव-मनमाड-येवला मार्गावर (manmad malegaon road ) अपघाताची (accident) मालिका सुरूच असून रोज या मार्गावर अपघात होत आहे. शनिवारी मालेगाव रोडवर कंटेनर आणि स्कॉर्पिओचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना आज पहाटे येवल्याच्या सावरगाव फाट्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत स्विफ्ट गाडीला भीषण अपघात होऊन त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे.
येवला तालुक्यातील धामोडे इथं सावरगाव फाट्यावर शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. पाच जण हे मारुती सुझुकीच्या स्विफ्ट कारमधून येवल्याकडे येत होते. नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड, तब्बल 211 तरुण-तरुणी ताब्यात
मध्यरात्रीच्या सुमारास धामोडे येथे कार आली असता अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती की, धडक दिल्याने स्विफ्ट गाडीतील मागे बसलेले तिघेजण जागीच ठार झाले. तर पुढील दोघे जण जखमी झाले आहे. जोरात धडक बसल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. यात कारच्या मागील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.
भारतातील 'या' गावात साजरा केला जातोय कमला हॅरिस यांचा विजय, पाहा PHOTOS
या अपघातात कारमध्ये समोर बसलेल्या दोघेजण जखमी झाले आहे. या दोघांवर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या अज्ञात वाहनाचा तपास पोलीस करत आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. दोन वाहनांच्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला तर महिला जखमी झाली होती. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा जागीच चुराडा झाला.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, वाहनाचा चुराडा तर चालकाचा जागीच मृत्यू pic.twitter.com/SsNnzXH9PZ
पहाटेच्या सुमारास सिमेंटची वाहतूक करणारा बल्क टँकर सोलापूरहून पुण्याच्या दिशेनं जात होता. त्यावेळी चालकाचा अंदाज चुकल्यानं समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर हा टँकर धडकला. यामध्ये बल्क टँकरचाही चुराडा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.