झालेली दगडफेक ही राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे झाली आहे की गाडी लुटण्याच्या उद्देशाने झाली याबाबत अद्याप प्रश्न चिन्ह आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. राष्ट्रवादीच्या गाव संपर्क अभियानला आदित्य जीवनराव गोरे जात असताना हा हल्ला झाला आहे. आदित्य गोरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांचे चिरंजीव आहेत. हेही वाचा- ''मी पैसे घेऊन पळालो नाही'', अशरफ गनी यांचं आरोपांवर स्पष्टीकरण या हल्ल्यात गाडीची मागील काच फुटली असून गाडीत असणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आदित्य गोरे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर अज्ञातांनी केली दगडफेक pic.twitter.com/e1UPT4hs2X
— News18Lokmat (@News18lokmat) August 19, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.