पुलाखालील पाईपमध्ये आढळला जळालेल्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह

पुलाखालील पाईपमध्ये आढळला जळालेल्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह

पुलाखालील पाईपमध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तडखेल येथे ही घटना समोर आली आहे.

  • Share this:

मुजीब शेख, (प्रतिनिधी)

नांदेड, 17 जुलै- पुलाखालील पाईपमध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तडखेल येथे ही घटना समोर आली आहे. 18 ते 20 वयोगटातील तरुणीचा हा मृतदेह आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेली माहिती अशी की, देगलूर तालुक्यातील तडखेल गावाशेजारील पुलाखालील पाईपमध्ये बुधवारी एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली. तरुणीसोबत घातपात करुन पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले आहे. चेहरा ओळखू येऊ नये, यासाठी चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आला आहे. सदर तरुणी ही अंदाजे 18 ते 20 वयोगटातील आहे. तरुणीची ओळख अद्याप पटली नसून पुढील तपासणीसाठी तिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. 18 ते 20 वयोगटातील तरुणी हरवली असल्यास देगलूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेने मात्र देगलूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नांदेड एक्स्प्रेसमध्ये सापडली स्फोटके?

राजस्थानमधील श्रीगंगानगर रेल्वे स्टेशनवर बुधवारी नांदेड एक्स्प्रेसमध्ये संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. या वस्तू स्फोटके असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. ही माहिती मिळताच घटनास्थळी एसडीएम मुकेश बारहठ, एएसपी सुरेंद्र राठोड यांच्यासह अनेक अधिकारी पोहोचले. लष्कराच्या बॉम्बशोध पथकाला पाचारण करण्यात आले आहे. एक्स्प्रेस गाडी रिकामी करण्यात आली आहे. एक्स्प्रेसच्या एस-4 बोगीतून संशयास्पद वस्तू असलेली बॅग पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

VIDEO : न विचारता बिस्किट खाल्ले म्हणून विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारलं

First published: July 17, 2019, 6:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading