पाण्यात बुडलेल्यांचा काही सेकंदात वाचवायचा जीव, विहीरीत बुडून स्वत: गमावले प्राण; 21 तासांनंतर मिळाला मृतदेह

पाण्यात बुडलेल्यांचा काही सेकंदात वाचवायचा जीव, विहीरीत बुडून स्वत: गमावले प्राण; 21 तासांनंतर मिळाला मृतदेह

विशेष म्हणजे प्रकाश आंधळे हा युवक पट्टीचा पोहणारा असल्याने तो पाण्यात बुडणार नाही अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा होती.

  • Share this:

किशोर गोमाशे, प्रतिनिधी

वाशिम, 24 डिसेंबर : वाशिम जिल्ह्याच्या भर जहाँगिर परिसरातील विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 38 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रकाश साहेबराव आंधळे असं मृत युवकाचं नाव असून या युवकाचा मृतदेह तब्बल 21 तासांनंतर शोधण्यात संत गाडगे बाबा आपत्कालीन बचाव पथकाला यश आलं आहे.

भर जहांगीर परिसरात विहिरीमध्ये रविवारी दुपारी 4 च्या दरम्यान प्रकाश आंधळेने पोहण्यासाठी उडी मारली. त्यांनतर तो बराच वेळ होऊनही पाण्याबाहेर न आल्याने स्थानिक मुलांनी विहिरीमध्ये त्याचा सायंकाळपर्यंत शोध घेतला. मात्र, शोध न लागल्याने शोध कार्य थांबवण्यात आलं. विशेष म्हणजे प्रकाश आंधळे हा युवक पट्टीचा पोहणारा असल्याने तो पाण्यात बुडणार नाही अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा होती.

अखेर आज पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाचे दीपक सदाफळे आणि त्यांच्याचमूने प्रकाश आंधळेचा मृतदेह विहिरीतून शोधून काढला. प्रकाश आंधळे हा युवक मजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या - अज्ञात वाहनाची Duke ला धडक, हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या 2 तरुणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गावात कोणीही बुडालं तर प्रकाश यांना मदतीसाठी बोलावलं जायचं. पाण्यात एखाद्याचा मृतदेह शोधायचा जरी असेल तरी प्रकाश यांना प्राचारण करण्यात यायचं. त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, यावर अद्याप गावकऱ्यांचा विश्वास बसत नाहीये. पोलिसांनी या सगळ्या बाबींची नोंद करत पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.

इतर बातम्या - जेलर महिला पडली कैद्याच्या प्रेमात, KISS करतानाचे फोटो व्हायरल; मिळाली शिक्षा

घटनास्थळावरून पोलिसांनी प्रकाश यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच नक्की कोणत्या कारणामुळे प्रकाश यांचा मृत्यू झाला हे समोर येईल आणि तपास करण्यास योग्य दिशा मिळेल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पण प्रकाश यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - भर रस्त्यात पत्नीला अडवून पतीने केली मारहाण, रागात फाडले कपडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 08:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading