बीडचा अनिल कपूर म्हणतोय मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, राज्यपालांना पत्र

बीडचा अनिल कपूर म्हणतोय मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, राज्यपालांना पत्र

सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्रीपदाचं खूळ डोक्यात घेतलेल्या तरुणाने बीड ते लालबागच्या राजा मुंबईपर्यंत दंडवत आणि पायी वारी केली. मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊदे असा त्याने लालबागच्या राज्यालादेखील नवस केला केला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हटलं की सगळ्यांना अभिनेता अनिल कपूरचा 'नायक' हा सिनेमा आठवतो. हा सिनेमा पाहिल्यानंतर मुख्यमंत्री बनण्याचे अनेकांना स्वप्न पडलं असावं. मात्र, बीडमध्ये एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने थेट राज्यपालांना अर्ज लिहून एक दिवसांचा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या तरुणाने शेतकरी, व्यापारी कष्टकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन न्याय देतो असं पत्रात नमूद केलं आहे. सध्या या तरुणाची सगळीकडे चर्चा आहे.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्रीपदाचं खूळ डोक्यात घेतलेल्या तरुणाने बीड ते लालबागच्या राजा मुंबईपर्यंत दंडवत आणि पायी वारी केली. मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊदे असा त्याने लालबागच्या राज्यालादेखील नवस केला केला आहे. त्यामुळे या तरुणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील देवगाव दहिफळ इथल्या 35 वर्षीय श्रीकांत विष्णू गदळे असं या तरुणाचं नाव आहे. एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्याने लालबागच्या राजाला 2016 साली नवस केला होता. त्यावेळी त्याने नारळ फोडताना तो उभा फुटला. म्हणून या पठ्याला विश्वास आहे की लालबागच्या राजाने कौल दिला. तो नवस पूर्ण करण्यासाठी हा तरुण त्यांच्या मूळ गावापासून ते थेट मुंबईच्या लालबागच्या राजापर्यंत पायी चालत आणि दंडवत घालत आला. बुधवारी तो मुंबईत पोहोचला.

इतर बातम्या - महाराष्ट्राच्या पूरपरिस्थिती आणि दुष्काळावर मुख्यमंत्री महत्त्वाची बैठक

सिनेमातलं आभासी विश्व प्रत्यक्षात येणं काही शक्य नाही. पण तरीदेखील या श्रीकांतला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडलं आहे. म्हणूनच की काय त्याने थेट महाराष्ट्राचे राज्यपालांना पत्रलिहून एक दिवसांचा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. मुख्यंमत्री होऊन शेतकरी, व्यापारी कष्टकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन न्याय देतो  असं त्याचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - लाडाची लेक समलैंगिक असल्याचं समजताच वडिलांनी स्वत:ला संपवलं, डोक्यात घातल्या गोळ्या

आतापर्यंत बरेच नेते मंडळी, मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले आपण पाहिले असतील. पण थेट लालबागच्या राज्याला साकडं घालून राज्यपालाना अर्ज लिहून मुख्यमंञी करा अशी मागणी करणारा कदाचित हा एखादाच असेल. या तरुणांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या - अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण!

SPECIAL REPORT: लातूरमधील भाजपच्या गटबाजीचा फायदा राष्ट्रवादीला?

Published by: Renuka Dhaybar
First published: September 12, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading