Home /News /maharashtra /

दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला खिंडार.. कसा झाला मालमत्तेचा लिलाव, पाहा VIDEO

दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला खिंडार.. कसा झाला मालमत्तेचा लिलाव, पाहा VIDEO

दाऊदची 7 वी मालमत्ता लिलावातून बाद

मुंबई, 10 नोव्हेंबर: अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या आर्थिक साम्राजाला खिंडार पडलं आहे. दाऊदच्या 7 मालमत्तांचा लिलाव व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आला. त्यापैकी रत्नागिरी येथील दाऊदच्या वडिलो पार्जित बंगल्याचाही लिलाव करण्यात आला आहे. महाराष्ट्रच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये या सर्व मालमत्ता आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव करण्यात आला. हेही वाचा...Bihar Election Result 2020: बिहार निवडणुकीत का फेल झाला एक्झिट पोलचा "चाणक्य" दाऊद इब्राहिम याच्या 7 पैकी 6 मालमत्तांचा लिलाव आज मंगळवारी झाला. मात्र, दाऊदची 7 वी मालमत्ता लिलावातून बाद करण्यात आली आहे. इकबाल मिर्चीच्या मालमत्तेवर बोली लागली नाही. दाऊदचं घर आणि शेतीचा डिजीटल पद्धतीने मुंबईतून लिलाव झाला. मात्र, लिलावात मुंबके गावातील शेतकरी सहभागी झाले नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली. सेफमातर्फे दाऊदची वडिलो पार्जित जमीन आणि घरांचा लिलाव करण्यात आला. दाऊदची मालमत्ता घेणारे दोघेही दिल्लीत राहणारे आहेत. दोघेही पेशाने वकील असून अजय श्रीवास्तव आणि भुपेंद्र भारद्वाज अशी त्यांचे नावे आहेत. दाऊदच्या सहापैकी चार संपत्ती वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी जिंकल्या असून उर्वरित दोन संपत्ती वकील अजय श्रीवास्तव यांनी जिंकल्या आहेत. दाऊदच्या संपत्तीचा हा दुसऱ्यांदा लिलाव झाला असून या वेळेस दाऊदचा रत्नागिरीतील बंगला लिलावातील आकर्षण होते जो बंगला वकील अजय श्रीवास्तव यांनी 11 लाख 30 हजारांना बोली लावून विकत घेतला. यापूर्वी मुंबईमधील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉप्रटींचा लिलाव करण्यात आला होता. आता रत्नागिरीतील त्याची कौटुंबिक जमीन आणि घराचा ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करण्यात आला. भुपेंद्र भारद्वाज यांनी जिंकलेली संपत्ती- सर्वे नंबर 151 (27 गुंठे) सर्वे नंबर 152 (29 गुंठे) सर्वे नंबर 150 (20 गुंठे) सर्वे नंबर 155 ( 18 गुंठे) अजय श्रीवास्तव यांनी जिंकलेली संपत्ती सर्वे नंबर 153 ( 24 गुंठे) सर्वे नंबर 181( घर क्रमांक 172 , 27 गुंठे) दाऊदच्या आईच्या नावावर एक घर.. दम्यान, मुंबके गावातील मालमत्ता ही दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला आहे. आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात आला. हेही वाचा... Bigg Boss14च्या घरात नवा ट्विस्ट; राहुल वैद्य 'खास व्यक्तीला' करणार प्रपोज कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित जमीन सध्या त्याचे काका कसत आहेत. पण, आता लिलाव होत असेल तर सरकारच्या नियमांप्रमाणे व्हावे, अशी आशा दाऊदच्या काकांनी व्यक्त केली. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाबाबत अनेकांना उत्सुकता होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Dawood ibrahim, Maharashtra, Mumbai

पुढील बातम्या