मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात महापारेषणची भूमिगत वीजवाहिनी जेसीबीने तोडली, वीजपुरवठा विस्कळीत

पुण्यात महापारेषणची भूमिगत वीजवाहिनी जेसीबीने तोडली, वीजपुरवठा विस्कळीत

पुण्यातील दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने साफसफाई करताना महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटली आहे.

21 सप्टेंबर : पुण्यातील दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने साफसफाई करताना महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटली आहे. त्यामुळे महापारेषणचे 132 केव्ही जीआयएस तसंच महावितरणच्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडलाय.

परिणामी पुणे शहरातील रास्तापेठ, कसबा पेठ आणि इतर सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट आदी परिसरातील वीजपुरवठा गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास विस्कळीत झाला आणि त्याचा सुमारे अडीच लाख वीजग्राहकांना फटका बसला आहे.

दरम्यान, महावितरणकडून इतर उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने या सर्व परिसरात पुढील दोन दिवस नाईलाजास्तव 3 ते 4 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार  आहे.

तसंच दुरुस्तीसाठी चेन्नईवरून सामुग्री मागवण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे पुणेकरांना  वीज जपून वापरण्याचं महावितरणनं आवाहन केलंय.

First published:

Tags: Pune, Pune electrcity, पुणे, महापारेषण, महावितरण, वीज