दक्षिण मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती

दक्षिण मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती

नागपाडा परिसरात सोमवारी दुपारी इमारतीचा काही भाग कोसळला. ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, १५ एप्रिल-दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात बांधकाम सुरु असलेल्या ३ मजली इमारतीचा इमारतीचा काही भाग कोसळला. पीर खान मार्गावर सोमवारी (ता.१५) दुपारी ही घटना घडली. ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मागील २४ तासांत ही दुसरी घटना आहे.

दरम्यान, मुंबईतील धारावीच्या पीएमजीपी कॉलनीमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळला होता. रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बाईकवरुन जाणाऱ्या एक व्यक्तीसह तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळं इमारतीचा भाग कोसळली आहे असं सांगण्यात येत आहे.

VIDEO: निवडणुकांआधीच काँग्रेसचा जल्लोष, संजय निरुपमांवर पुष्पवर्षाव

First published: April 15, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading