मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जन्म, लग्न आणि मृत्यूही एकाच दिवशी; जळगावातील काका-पुतण्यांची अनोखी जीवन कहाणी

जन्म, लग्न आणि मृत्यूही एकाच दिवशी; जळगावातील काका-पुतण्यांची अनोखी जीवन कहाणी

एकाच दिवशी जन्म होणं, एकाच दिवशी एकाच गावातील मुलींसोबत लग्न होणं आणि एकाच दिवशी मृत्यू येणं असे योगायोग जवळपास अशक्य वाटतील. पण जळगावातील काका-पुतण्यासोबत असंच घडलं आहे.

एकाच दिवशी जन्म होणं, एकाच दिवशी एकाच गावातील मुलींसोबत लग्न होणं आणि एकाच दिवशी मृत्यू येणं असे योगायोग जवळपास अशक्य वाटतील. पण जळगावातील काका-पुतण्यासोबत असंच घडलं आहे.

एकाच दिवशी जन्म होणं, एकाच दिवशी एकाच गावातील मुलींसोबत लग्न होणं आणि एकाच दिवशी मृत्यू येणं असे योगायोग जवळपास अशक्य वाटतील. पण जळगावातील काका-पुतण्यासोबत असंच घडलं आहे.

  • Published by:  News18 Desk

जळगाव, 10 ऑक्टोबर: आयुष्य जगत असताना आपल्या जीवनात अनेक योगायोग घडत असतात. पण एकाच दिवशी जन्म होणं, एकाच दिवशी एकाच गावातील मुलींसोबत लग्न होणं आणि एकाच दिवशी मृत्यू येणं असे योगायोग जवळपास अशक्य वाटतील. पण जळगावातील काका-पुतण्यासोबत असंच घडलं आहे. या विचित्र योगायोगामुळे गावात आश्चर्य व्यक्त केलं जात असून ही काका-पुतण्याची अनोखी जीवन कहाणी (uncle nephew birth, marriage and death on same day)जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, पिरन पांडू भील आणि सुकलाल भिवा भील असं संबंधित काका-पुतण्याचं नाव आहे. दोघंही जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील हिवरे येथील रहिवासी आहेत. संबंधित काका-पुतण्याचा जन्म 1970 साली एकाच दिवशी झाला होता. जन्मच एका दिवशी झाल्याने दोघांची पक्की दोस्ती होती. एकाच ठिकाणी दोघंही लहानाचे मोठे झाले, त्यामुळे दोघांत एक अनोखा जिव्हाळा होता. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. तर दोघांनाही एकाच गावातील वधू मुली शोधण्यात आल्या आणि लग्नही एकाच दिवशी झालं.

हेही वाचा-3 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य; घरमालकाने 10 रुपयाच्या बहाण्याने बोलावलं अन्..

विशेष म्हणजे दोघंही बाह्मणे गावचे घरजावई झाले. गेल्या 20-25 वर्षांपासून दोघंही एकाच गावात वास्तव्याला होते. दरम्यान 2019 साली काका पिरन भील यांना अर्धांगवायू झाला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ते खाटेवर पडून होते. तर 8 ऑक्टोबर रोजी अचानक पुतण्या सुकलाल भील यांच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. सुकलाल यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी बाह्मणे गावात मोबाइलवरून घटनेची माहिती दिली.

हेही वाचा-अभ्यास ठरलं अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं कारण; कोल्हापुरातील हृदय हेलावणारी घटना

योगायोग म्हणजे ज्या व्यक्तीजवळ मृत्यूची बातमी सांगितली, त्याने दुसरीकडून सुकलाल यांचा काका पिरन यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळवली. हे ऐकून नातेवाईकांना देखील धक्का बसला. काका आणि पुतण्याच्या आयुष्यातील विविध घटनांमध्ये घडलेलं साधर्म्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांचा जन्म एकाच दिवशी, लग्नही एकाच दिवशी, एकाच गावचे जावई, आणि मृत्यूची तारीख आणि वेळही सारखीच असल्याने काका पुतण्याच्या जीवनाची अनोखी कहाणी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

First published:

Tags: Jalgaon