शिवसेना काढणार भाजपचा पाठिंबा? अविश्वास ठरावावेळी शिवसेना भूमिका करणार जाहीर

शिवसेना काढणार भाजपचा पाठिंबा? अविश्वास ठरावावेळी शिवसेना भूमिका करणार जाहीर

संसदेत आज सरकारविरोधात 2 अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहेत. आंध्रमधले 2 पक्ष म्हणजेच तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस स्वतंत्रपणे मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहेत.

  • Share this:

19 मार्च : संसदेत आज सरकारविरोधात 2 अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहेत. आंध्रमधले 2 पक्ष म्हणजेच तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस स्वतंत्रपणे मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहेत. आता यात भाजपकडे जरी स्पष्ट बहुमत असलं, तरी शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या संसदेत शिवसेनाही सरकाविरोधात उभी ठाकणार का हेच बघणं महत्त्वाचं आहे.

कारण, शिवसेना सरकारच्या बाजूनं मतदान करणार, विरोधात करणार की मतदानच करणार नाही, हे अद्याप जाहीर केलेलं नाही आहे. त्यामुळे शिवसेना नेमका कोणता निर्णय घेतेय याकडेच आज सगळ्यांचं लक्ष लागणार आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळाला नाही म्हणून नाराज असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांनी भारतीय जनता पार्टीसोबत (एनडीए) संबंध तोडले आहेत. त्यावर आज वायएसआर काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव देणार आहे ज्याला टीडीपीही पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दोन महिन्यांवर कर्नाटक निवडणूका आल्या असताना चंद्राबाबू नायडू यांनी घेतलेला हा निर्णय भाजपसाठी धोक्याचा आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातला पराभव आणि दुसरीकडे शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय यातून भाजपचे अच्छे दिन गेले असं म्हणायला हरकत नाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 08:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading