मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उमेश कोल्हे हत्या प्रकरण: 2 महिने उलटले तरी आरोपीचा पत्ता मिळेना, NIA कडून मोठी घोषणा

उमेश कोल्हे हत्या प्रकरण: 2 महिने उलटले तरी आरोपीचा पत्ता मिळेना, NIA कडून मोठी घोषणा

अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ ​फिरोज अहमदवर NIA नं बक्षीस जाहीर केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Kranti Kanetkar

अमरावती, 13 सप्टेंबर : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ ​फिरोज अहमदवर NIA नं बक्षीस जाहीर केलं आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. NIA ने याबाबत घोषणा केली आहे.

उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली आहे. यामधील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम असल्याची माहितकी मिळाली आहे.

अमोल कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं ही हत्या करण्यात आल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या बाजूने चौकशी सुरू केली. हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला अटक करण्यात आली. मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे. या प्रकरणी NIA ने आता त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

नेमकं काय प्रकरण

उमेश कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे 'मेडिकल स्टोर' बंद करून घरी जात असताना त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यावेळी उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता.

मुलगा संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार 'मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते, अशी माहिती अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली होती.

First published:

Tags: Nia