Home /News /maharashtra /

Umesh kolhe murder case : उमेश कोल्हेंच्या मानेवर 8 बाय 2 इंचाची जखम, निर्घृण हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

Umesh kolhe murder case : उमेश कोल्हेंच्या मानेवर 8 बाय 2 इंचाची जखम, निर्घृण हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

 या प्रकरणाचा आता धक्कादायक खुलासा झाला असून उमेश कोल्हे (umesh kolhe murder case) यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

या प्रकरणाचा आता धक्कादायक खुलासा झाला असून उमेश कोल्हे (umesh kolhe murder case) यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

या प्रकरणाचा आता धक्कादायक खुलासा झाला असून उमेश कोल्हे (umesh kolhe murder case) यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

    अमरावती, 06 जुलै : अमरावतीचे (Amravati ) पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा (Nupur Sharma Case) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा आता धक्कादायक खुलासा झाला आहे.  उमेश कोल्हे (umesh kolhe murder case) यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये मानेच्या डाव्या बाजूला 8 बाय 2 इंच जखम झाली. माने जवळची वेन आणि अर्टरी कापल्याने मृत्यू  झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची भाजपच्या नेत्या नपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ हत्या झाल्याचा स्पष्ट झाले आहे. आता या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात आलेला.  उमेश कोल्हे यांचा शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. या अहवालानुसार, उमेश कोल्हे यांचा मृत्यू त्यांच्या मानेच्या डाव्या बाजूला जुगुलर वेन आणि कॅरोटीन अर्टरी कापल्याने मृत्यू झाला. मानेच्या डाव्या बाजूला 8 बाय 2 इंच जखम झाली आहे. तसंच, माने जवळची वेन कापल्या गेल्याने मेंदूला रक्त पुरवठा बंद झाला त्यामुळेच उमेश कोल्हे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काय आहे प्रकरण? उमेश कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे 'मेडिकल स्टोर' बंद करून घरी जात असताना त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. मुलगा संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार 'मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहत होतं. मी माझी गाडी थांबवली आणि मदतीसाठी लोकांना ओरडून विनंती केली. त्यावेळी अन्य एक जण आला आणि त्यासोबत दोन्ही मारेकरी मोटारसायकलीवरून फरार झाले. मी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 'अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते.' मुख्य सूत्रधाराला 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दरम्यान, उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ऊर्फ इरफान खान याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला शनिवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आली होती. आरोपीला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात आरोपीला नेण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने  कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशी केली. न्यायालयाने इरफानला येत्या 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी इरफानला या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानले आहे. याआधी पोलिसांनी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (25), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (24), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (22), अतिब रशीद आदिल रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या