मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मित्रानेच काढला मित्राचा काटा; आधी मडक्याने हल्ला मग जमिनीवर डोकं आपटून दिला भयंकर मृत्यू

मित्रानेच काढला मित्राचा काटा; आधी मडक्याने हल्ला मग जमिनीवर डोकं आपटून दिला भयंकर मृत्यू

Crime News: किरकोळ वादनंतर मित्रानेच आपल्या मित्रावर जीवघेणा हल्ला करुन त्याला भयंकर मृत्यू दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

Crime News: किरकोळ वादनंतर मित्रानेच आपल्या मित्रावर जीवघेणा हल्ला करुन त्याला भयंकर मृत्यू दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

Crime News: किरकोळ वादनंतर मित्रानेच आपल्या मित्रावर जीवघेणा हल्ला करुन त्याला भयंकर मृत्यू दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

  • Published by:  Sunil Desale

उल्हासनगर, 30 नोव्हेंबर : मित्रानेच आपल्या मित्रावर जीवघेणा हल्ला करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हानगरमधील कॅम्प 4 (Ulhasnagar camp 4) येथील मराठा सेक्शन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी किरण म्हात्रे याला पोलिसांनी अटक (accused Kiran Mhatra arrested) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (Ulhasnagar youth killed friend)

बदनामी केल्याचा राग

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासगरमधील राहुल आणि किरण म्हात्रे हे एकमेकांचे मित्र होते. राहुल आपल्याबद्दलची माहिती इतरांना देऊन बदनामी करत असल्याचं किरण म्हात्रे याला वाटत होतं. याचाच राग किरण म्हात्रे याच्या डोक्यात होता. त्यामुळे किरण याने राहुलला अद्दल घडवायची असा निर्णय घेतला.

वाचा : Heart Attack आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जमिनीवर डोकं आपटून दिला मृत्यू

त्यानुसार, 29 नोव्हेंबर रोजी किरण याने राहुलला मारहाण केली. आधी राहुलच्या डोक्यात मडका फेकून मारला. या हल्ल्यात राहुल जखमी झाला. त्यानंतर किरणे राहुलचे डोके जमिनीवर वारंवार आपटले आणि त्यात तो रक्तबंबाळ झाला. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने राहुलचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण याला अटक केली आहे.

उल्हानगरमधील मराठा सेक्शन परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी किरण म्हात्रे याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

वाचा : मुलीवर प्रेम करतो म्हणून बापाने प्रियकराची हत्या केली आणि जमिनीत गाडले

मुंबईत तरुणीचा हत्या

पाच दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला येथील एचडीआयएल परिसरातील वापरात नसलेल्या एका 13 मजली इमारतीच्या टेरेसवर एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आरोपींनी मृत मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असताना, मृत मुलीच्या प्रियकराला आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिली असून हत्येपूर्वी बलात्कार केला नसल्याचं त्यांनी पोलीस चौकशीत म्हटलं आहे. तसेच मृत मुलगी लग्नासाठी दबाव टाक असल्याच्या रागातून तिची सुरा आणि हातोडीनं वार करून हत्या केल्याचं आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास विनोबा भावे नगर पोलिसांसह, कुर्ला आणि धारावी पोलीस संयुक्तपणे करत आहेत.

First published:

Tags: Crime, Murder, Ulhasnagar