मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; 7 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

VIDEO: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; 7 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

Ulhasnagar building slab collapsed: उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्बॅल कोसळून मोठी दुर्घटना झाल्याचं वृत्त आहे.

Ulhasnagar building slab collapsed: उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्बॅल कोसळून मोठी दुर्घटना झाल्याचं वृत्त आहे.

Ulhasnagar building slab collapsed: उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्बॅल कोसळून मोठी दुर्घटना झाल्याचं वृत्त आहे.

उल्हासनगर, 28 मे: उल्हासनगर (Ulhasnagar)मध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब (Building slab fall down) कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. उल्हासनगर शहरात पंधरा दिवसात इमारतीचा स्लॅब कोसळून दुसरी मोठी दुर्घटना घडलीय. कॅम्प नंबर 2 च्या साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून तळ माजळ्याला आला. इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू (7 people died) झाला आहे तर इतर काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर ढिगाऱ्याखाली आणखी तीन नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

VIDEO: दारूच्या नशेत मित्राच्याच डोक्यात फोडली बाटली, घटना सीसीटीव्हीत कैद

घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांसोबतच स्थानिक नागरिकही मदत कार्यात सहभागी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आल्याने इमारतीत अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखालून आता दोन व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Ulhasnagar