News18 Lokmat Impact: बनावट स्वॅब स्टिक प्रकरणात बायोसेन्स कंपनीचा हेड आणि सीईओला अटक

News18 Lokmat Impact: बनावट स्वॅब स्टिक प्रकरणात बायोसेन्स कंपनीचा हेड आणि सीईओला अटक

बनावट स्वॅब स्टिक घरात पॅकिंग करण्याच्या प्रकरणात उल्हासनगर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 8 मे: कोरोना तपासणीसाठी आवश्यक असलेल्या आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR Covid test)साठी वापरण्यात येणाऱ्या स्वॅब स्टिक्सचं (Swab stick packing) घराघरात पॅकिंग होत असल्याचं न्यूज 18 लोकमत (News18 Lokmat)ने उघडकीस आणलं. त्यानंतर या प्रकऱणात पोलिसांनी कारवाई करत आता आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांनी बायोसेन्य या कंपनीचा हेड आणि कंपनीचा सीईओ या दोघांना अटक केली आहे.

बनावट स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरणात उल्हानगर पोलिसांनी बायोसेन्स या कंपनीचा हेड आणि सीईओला अटक केली आहे. अभिषेक सेन आणि कल्पेश हेगडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कंपनीतील मोठ्या पदावरील अधिकारी आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक केली आहे.

उल्हासनगर RT-PCR स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरण; अखेर ठेकेदार मनीष केशवानीला अटक

कोरोना झाला आहे की नाही यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचणी ही खूपच महत्वाची मानली जाते. या आरटीपीसीआर चाचणीसाठी आवश्यक असलेल्या स्वॅब स्टिक्सचं उल्हासनगरमध्ये घरोघरी पॅकिंग सुरू असल्याचा प्रकार न्यूज 18 लोकमतने उघडकीस आणला होता.

उल्हासनगर येथील कॅम्प 2 च्या खेमानी संत ज्ञानेश्वर नगर परिसरात घरोघरी महिला, लहान मुले हे स्वॅब स्टिकचं पॅकिंग करत असल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून कारवाई सुद्धा केली होती. या प्रकरणात ठेकेदार मनीष केशवानी याला अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 8, 2021, 9:46 PM IST

ताज्या बातम्या