• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ... आणि Bike rider थेट पडला उघड्या चेंबरमध्ये, Ulhasnagar मधील घटनेचा LIVE VIDEO

... आणि Bike rider थेट पडला उघड्या चेंबरमध्ये, Ulhasnagar मधील घटनेचा LIVE VIDEO

Bike rider fall in open gutter ulhasnagar: बाईकस्वार उघड्या चेंबरमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:
उल्हासनगर, 24 सप्टेंबर : पावसामुळे (Rain) आधीच सर्वत्र रस्त्यांवर खड्डे पडल्याचं पहायला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना (accidents due to potholes) होत असतानाच आता उघड्या चेंबरचा (open chamber) प्रश्नही पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण म्हणजे रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका उघड्या चेंबरमध्ये बाईकस्वार पडल्याची घटना आता समोर आली आहे. ही संपूर्ण घटना घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Biker fall in open gutter) उल्हासनगर कॅम्प 3 च्या श्याम सुंदर सोसायटी समोर रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या चेंबरमध्ये एक बाईकस्वार गाडीसह पडला. स्थानिकांनी लगेच बाईकस्वाराला मदत करीत त्याला बाहेर काढले. या अपघातात बाईकस्वार थोडक्यात बचावला आहे. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. सुदैवाने बाईक चेंबरमध्ये पडताना अडकली आणि मोठा अपघात टळला. भिवंडीत खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा अपघात जुलै महिन्यात खड्ड्यांमुळे अपघात होऊन एका 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. भिवंडी तालुक्यातील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची पावसाळ्यात दुरावस्था झाल्याने पुन्हा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गाच्या रस्त्यावर खड्ड्यामुळे एका तरुणाचा अपघात झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तेजस अभिमन्यू पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मित्रांसह कामानिमित्त बाहेर गेला होता. घरी परतत असताना खड्ड्यात त्याची गाडी आदळून अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मुंबईत महिला पडली उघड्या मॅनहोलमध्ये जून महिन्यात असाच प्रकार उघडकीस आला होता. भांडूप पश्चिम येथील व्हिलेज रस्त्यावर असेलल्या एका मॅनहोलचे झाकण उघडे होते. मुसळधार पावसात पाणी साचल्याने हे उघडे मॅनहोल्स न दिसल्याने दोन महिला त्यात पडल्या. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीएमसीने तातडीने हालचाल करत पावलं उचललं आणि त्या मॅनहोल्सवर आता झाकणं लावण्यात आली आहेत. पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. असे असले तरी, कालच्या जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर महानगरपालिकेच्‍या वतीने पुन्‍हा एकदा सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जात आहे. आवश्‍यक तेथील मॅनहोल बदलण्‍याची कार्यवाही करण्‍यात येत आहे अशी माहिती मुंबई मनपाकडून देण्यात आली आहे. भिवंडीत मुलीला घेऊन दुचाकीस्वार थेट खड्ड्यात मार्च महिन्यात भिवंडीत काहीसा असाच प्रकार घडला होता. भिवंडी-वाडा रोडवर मुलीला घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात दुचाकीस्वार पडल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलीला आणि पित्याला दुखापत झाली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भिवंडी- वाडा रोडवर शेलार नदीनाका इथं आरसीसी रोडचे आणि नाल्याचे काम सुरू होते. परंतु, ठेकदाराच्या गलथान कारभारामुळे नाल्याचे खड्डे असताना कोणत्याच प्रकारे नागरिकांच्या सुरक्षाची काळजी घेतली जात नाही. रस्त्याच्या बाजूला खड्डे पडलेले असल्यामुळे बॅरेकेड्स लावले नसल्याने एक दुचाकीस्वार दुचाकीसह थेट खड्ड्यात पडला.
Published by:Sunil Desale
First published: